राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरून माध्यमांना विचलित करण्यासाठी महाराष्ट्रात विरोधकांवर पोलीस कारवाया सुरु?
NCP Leader Jitendra Awhad | काँग्रेसची भारत जोडो यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक अशा दक्षिणेकडील राज्यांतून महाराष्ट्रात पोहोचली आहे. राज्यात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज पाचवा दिवस असून आता या यात्रेच्या माध्यमातून विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले आहेत. आज शुक्रवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यात सहभागी होणार आहेत. याआधी उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांच्याऐवजी आदित्य सामील होणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही या यात्रेत सहभागी होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते हजर होते. ही यात्रा आज सायंकाळी हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करणार असून, यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. दरम्यान, राज्यातील प्रसार माध्यमांनी देखील याचे कव्हरेज केल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, राज्यात माध्यमांना विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नव्या युक्त्या आखल्याचं म्हटलं जातंय.
2 वर्षांपूर्वी