JSW Energy Share Price | मल्टिबॅगर JSW एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूक करून फायदा घेणार?
JSW Energy Share Price | JSW एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 3 जुलै 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या वीज उत्पादक कंपनीचे शेअर्स 4 जुलै 2023 रोजी 295.10 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी JSW एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.23 टक्के वाढीसह 306.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2020-23 या काळात JSW एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 502.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या काळात सेन्सेक्स देखील 90 टक्के वाढला आहे.
2 वर्षांपूर्वी