Kantara Box Office | 'कंतारा' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धमाका, हिंदीमध्ये करणार का कमाई?
Kantara Box Office | कन्नड चित्रपट ‘कंतारा’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे आणि करत आहे. तसेच दक्षिण भारतामध्ये या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली आहे. कन्नड तसेच दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्येही या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. तर ऋषभ शेट्टी आणि सप्तमी गौडा स्टारर ‘कंतारा’ हा चित्रपटही हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांना पहायचा होता आणि आज त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे कारण या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन रिलीज झाले आहे मात्र अशा परिस्थितीत हा चित्रपट हिंदीत किती गल्ला जमवतो हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.
2 वर्षांपूर्वी