महत्वाच्या बातम्या
-
कर्नाटक: त्या आमदारांची धमकी..ही मंत्रालय द्या अन्यथा...येडियुरप्पा तातडीने दिल्लीला
कर्नाटक विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आणि आपली जागा निश्चित करणाऱ्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. येडियुरप्पा यांनी विजयी आमदारांना मंत्रीपदाची ऑफर दिली पण त्यांच्या अपेक्षा मोठ्या झाल्या आहेत आणि आमच्यामुळेच सरकार टिकणार आहे त्यामुळे त्यांनी मोठ्या मागण्या पुढे रेटल्या आहेत. आमदारांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे असं वृत्त आहे. त्यांना केवळ मंत्रीपदावरच आनंद नाही, तर त्यांना मोठी आणि महत्वाची खाती हवी आहेत आणि ती दिल्यास पक्षातील मोठ्या नेत्यांना खुर्च्या खाली कराव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपची डोकेदुखी संपली आणि बंडखोर आमदारांच्या जीवावर सत्ता राखली
कर्नाटकमध्ये असलेल्या मुख्यमंत्री येडुरप्पा यांच्या भारतीय जनता पक्ष सरकारचं भवितव्य आज ठरणार आहे. विधानसभेच्या १५ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर आता जवळपास चित्र स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पक्षाने १५ पैकी १२ जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस २ आणि अपक्ष एका जागी आघाडीवर आहे. राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला किमान ७ जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं.
5 वर्षांपूर्वी -
कर्नाटक: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत १५१ जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने आयत्यावेळी जनता दल सेक्युलरला पाठिंबा देत भाजपाला धक्का दिला होता. मात्र, वर्षभरात कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत पुन्हा सत्ता स्वतःकडे खेचून आणली होती.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री कोण यापेक्षा राज्यपाल अधिक चर्चेत का येतात? सविस्तर
२०१४पासून देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि त्यानंतर होतं गेलेल्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण यापेक्षा चर्चा रंगते ती संबंधित राज्याच्या राज्यपालांची आणि त्यांनी उचललेल्या ऐतिहासिक पावलांची. तसं देशातील तरुणांना पंतप्रधान आणि मुख्यंमत्री यापेक्षा इतर पदांबाबत जास्त माहिती किंवा समजून घेण्याची उत्सुकता नसते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या काँग्रेसमुक्त घोषणेच्या नादात कोणत्याही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रसार माध्यमांचा फोकस देखील राजभवनांवर अधिक असतो.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांनीच भाजपाला महाराष्ट्रात स्थान दिलं: माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि एनसीपी’ला सोबत घेऊन सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील या राजकीय उलथापालथीवर अनेक मतप्रवाह पाहायला मिळत असताना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे व काँग्रेसलाही महत्त्वाचा असा सल्ला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांचा अविचारी मास्टरस्ट्रोक, विधानसभेत 'पॉर्न' बघणारा आमदार कर्नाटकच्या उपमुख्यमंत्री पदी
सध्या संपूर्ण भारतीय जनता पक्षावर पकड असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे धक्कादायक निर्णय पाहून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे. कारण कर्नाटक विधानसभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात मोबाईलवर पॉर्न पाहणारे तत्कालीन मंत्री लक्ष्मण सवदी यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लावल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सरकारवर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; कर्नाटकात कमळ फुलले
कर्नाटकात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून शुक्रवारी शपथ घेतली. त्यानंतर त्यांना विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी आजपर्यंतची मुदत देण्यात आली होती. जो त्यांनी आवाजी मतदानाने जिंकला आहे. त्यामुळे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार कायम झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आता कर्नाटकात देखील भाजप राज्य, येडियुरप्पा यांचा आज शपथविधी
कर्नाटकमधील एचडी कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आता भाजप राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी पुढे सरसावला आहे. भाजप नेते येडियुरप्पा आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहेत. त्यांनी राज्यपालांशी भेटून सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांचा शपथविधी आज होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
धनशाही पुढे लोकशाही हरली! कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार कोसळलं
काँग्रेस, जेडीएसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. कर्नाटकमधील कुमारस्वामींचं सरकार बहुमत चाचणीत अपयशी ठरल्याने कुमारस्वामींचं सरकार अखेर कोसळलं आहे. काही दिवसापासून धनशक्तीच्या आधारे खेळला गेलेला हा डाव आज अखेर संपुष्टात आला असून, धनशाहीसमोर लोकशाहीने अक्षरशः नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटक: कुमारस्वामी सरकारला सायंकाळी ६ पर्यंतची अंतिम मुदत
कर्नाटकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण कर्नाटक विधानसभेत कालपासून सुरू असलेले राजकीयनाटक आज देखील पाहिल्याप्रमाणेच सुरू आहे. दरम्यान मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारवर बहूनत सिद्ध करण्याचा दबाव आणखी वाढला असून थोड्या वेळात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. कारण आज सायंकाळी ६ वाजेर्यंतची त्यांना मुदत देण्यात आली आहे. या अगोदर त्यांना आज दुपारी १:३० वाजेपर्यंत बहूमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटक: सत्तेसाठी चड्य्या, चादरी व उशा घेऊन भाजपा आमदारांचा विधानसभेतच मुक्काम
कर्नाटक राज्यात आमदार फोडाफोडीच्या राजकारणाने कळस गाठल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्यांना सहज उपलब्ध नसणारे प्रतिनिधी आणि पंचतारांकित आयुष्य जगणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्तेच्या लालसेपोटी विधानसभेत चड्य्या, चादरी व उशा घेऊन मुक्कामाला पोहोचले आहेत. भारतीय लोकशाही अक्षरशः टांगणीला लावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
कुमारस्वामींना धक्का, बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या एकूण १५ बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षाच्या नाट्यामध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना जोरदार राजकीय धक्का बसणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. दरम्यान बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागेल हे निश्चित आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा अध्यक्षांकडे आपली बाजू मांडा, बंडखोर आमदारांना न्यायालयाचे आदेश
कर्नाटकातील बंडखोर आमदारांचा राजीनाम्यामुळे सुरु झालेले नाट्य आता नव्या वळणावर येवून ठेपले आहे. याचिका दाखल करणाऱ्या आमदारांना आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सादर करुन आपली बाजू मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप? काँग्रेसचे व जेडीएस'चे ११ आमदार फुटणार
कर्नाटकात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण काँग्रेसचे एकूण ८ तर जेडीएसचे ३ असे मिळून तब्बल ११ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. एकूण संख्याबळानुसार जर १२ आमदारांनी राजीनामे सोपवले तर विद्यमान सरकार अल्पमतात येऊ शकते. मागील वर्षी कर्नाटक विधानसभेची निवडणूक पार पडली, तेव्हा पासून कर्नाटकातील भाजपचे धुरंदर सरकार पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते, मात्र लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर या हालचालींनी पुन्हा जोर धरला होता.
6 वर्षांपूर्वी -
कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काँग्रेस आमदारांना खरेदी करण्याच्या हालचाली?
कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारवर पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु असून, वाट्टेल ती किंमत मोजून त्यांची खरेदी केली जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ आमदारानेच हा दावा केला असून पक्षाचे तीन आमदार सध्या भारतीय जनता पक्षाच्या थेट संपर्कात असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मला असे समजले आहे, की ३ सप्टेंबरला नवीन कोणीतरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे: कुमारस्वामी
कर्नाटकात नव्या सरकारची स्थापना होऊन सुद्धा अनेक महिन्यांपासून जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या कुरबुरी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तसेच काँगेस नेते सिद्धरामय्या यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा त्याच कुरबुरींना तोंड फुटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मला कर्नाटकच्या फिटनेस व विकासाची चिंता, मोदींच फिटनेस चॅलेंज झिडकारल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींना दिलेलं फिटनेसच चॅलेंज झुगारून तर लावलेच पण मोदींना चांगलेच झोंबेल असं प्रतिउत्तर ट्विटर वरून दिल आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या शपथेची घाई करायला नको होती - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी येडियुरप्पा यांच्या अडीच दिवसाच्या कार्यकाळावर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या माते भाजपने सत्ता स्थापनेची घाई करायला नको होती, उलटअर्थी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून सय्यम ठेवला होता.
7 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा!
अडीच दिवसाचे मुख्यमंत्री राहून त्यांनी अखेर राजीनामा दिला आणि या संपूर्ण नाट्यमय घडामोडींवर पडदा पाडला आणि काँग्रेस – जेडीएसला सत्ता स्थापनेचे आव्हान केले. तरीही जर कर्नाटकात मध्यवर्ती निवडणूका लागल्या तर भाजप संपूर्ण बहुमताचे सरकार निवडून आणेल हा विश्वास व्यक्त केला.
7 वर्षांपूर्वी -
...तर १०० पटीने श्रीमंत व्हाल आणि मंत्रिपद सुद्धा मिळेल - ऑडिओ क्लिप
आम्हाला सांगा तुम्हाला कुठला पद हवं आहे? आपण समोर-समोर बसून बोलू आणि ठरवू. जर तुम्ही ऑफर स्वीकारली तर तुम्ही मंत्री बानू शकता आणि मोठ्या लोकांबरोबर तुमची उठबस होऊ शकते.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE