महत्वाच्या बातम्या
-
मला भाजपात प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती - आ. श्रीमंत पाटील
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असं भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी रविवारी सांगितलं. मात्र “मी भारतीय जनता पक्षाची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. परंतु, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही,” असंही पाटील म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांनी बसवराज बोम्मई यांना बसवलं आणि येडीयुराप्पा यांचे पंख छाटण्यास सुरुवात | अजून एक धक्का... वाद पेटणार?
भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्टींनीं कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदावरून येडीयुराप्पा यांना हटवून कर्नाटक सरकार पूर्णपणे मोदी-शहांच्या हातात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र त्यानंतर पुढच्या राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे. कारण मोदी-शहांनी बसवराज बोम्मई यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि येडीयुराप्पा यांचे पंख पूर्णपणे छाटण्यास सुरुवात झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा यांच्या मूळ गावात मोर्चे काढून भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त | पडसाद उमटण्यास सुरुवात
कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा देतेवेळी आपण समाधानी असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या समर्थकांनी मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. येडियुरप्पा यांच्या मूळ गावी ग्रामस्थांनी बंद पाळून ही नाराजी व्यक्त केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा यांचा राजीनामा की त्यांना हटवलं? | मोदी-शहांना मर्जीतील डमी मुख्यमंत्री बसवायचा आहे? - सविस्तर वृत्त
कर्नाटक राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री येडियुरप्पा राजीनामा देणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, आतापर्यंत याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलं नव्हतं. परंतु, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा पायउतार | मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पदावरुन पायउतार होण्याचे कालच संकेत दिले होते. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार आज त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पीटीआयने याबाबत अधिकृत वृत्त दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पदावरुन पायउतार होण्याचे संकेत दिले आहेत. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
कारण पक्षांतर्गत भ्रष्टाचाराचे आरोप? | पण वय, आरोग्याचं कारण देत येडियुरप्पा राजीनाम्याच्या तयारीत
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचं वृत्त आहे. यासाठी त्यांनी वय आणि आरोग्याच्या तक्रारी पुढे करत दिल्लीत वरिष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. सध्या तरी येडियुरप्पा यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मात्र कर्नाटकात मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पा सरकारकडून पाटबंधारे विभागात २१,४७३ कोटीचा घोटाळा | भाजप नेत्याकडून आरोप
भाजपाच्या कर्नाटकमधील सरकारच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण आता आरोप विरोधक नव्हे तर थेट भाजपमधीलच महत्वाचे नेते करू लागले आहेत. अनेक आमदार आणि मंत्री सध्या मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याची मागणी करत आहेत. परिणामी दिल्लीतील भाजप वरिष्ठांच्या देखील अडचणीत वाढ होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
धक्कादायक | कर्नाटकातील इस्पितळात २४ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू
भारतामध्ये कोरोनाचा विळखा हा दिवसेंदिवस घट्ट होत असताना दिसत आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये सलग तीन लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण समोर येत आहेत. रविवारी पुन्हा एकदा 3 लाख 50 हजार 598 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 3,071 रुग्णांनी जीव गमावला आहे. आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 882 राहिली. तर एकूण संक्रमितांचा आकडा आता दोन कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. आज ही संख्या 1.99 कोटींच्या पार पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दाहकता | कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी कर्नाटक सरकारकडून बेंगळुरूजवळ 230 एकर जमीन
जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, जगात गेल्या चोवीस तासांत 8 लाख 85 हजार 604 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 15 हजार 284 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील 17 देशांमध्ये भारतीय विषाणूचा स्ट्रेन आढळून आला असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने याला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ (VOI) घोषित केले असून B.1.617 या डबल म्यूटेंट व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत असल्याचा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटकमध्ये १४ दिवसांचा लॉकडाऊन नव्हे 'क्लोजडाऊन' | महाराष्ट्रात लादलेले कडक निर्बंधही तसेच कॉपी केले
देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटक सरकार | ऑपरेशन लोटस’ची चौकशी करण्यास न्यायालयाची परवानगी
देशाच्या राजकारणात बहुचर्चित ठरलेल्या कर्नाटकातील ऑपरेशन लोटसप्रकरणी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना बेंगळुरू उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांच्यासमोरील अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसने कर्नाटकला IT Hub बनवले | भाजप कर्नाटकाला Porn Hub बनवत आहे - भाई जगताप
महिलेला नोकरी देण्याचं आमिष दाखवल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेले कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. या प्रकरणात जारकीहोळी यांची एक कथित सेक्स सीडी बाहेर आल्यानंतर कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अडचणीत सापडले आहे.
4 वर्षांपूर्वी -
येडियुरप्पांनी प्रचंड भ्रष्टाचार केला | प्रल्हाद जोशी मुख्यमंत्री होतील | संभाषण लीक
महिलेला नोकरी देण्याचं आमिष दाखवल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेले कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिला. या प्रकरणात जारकीहोळी यांची एक कथित सेक्स सीडी बाहेर आल्यानंतर कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचं सरकार अडचणीत सापडले होते. ज्या सेक्स टेपमुळे त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली, त्याच प्रकरणात महिलेशी जारकीहोळी यांनी केलेलं संभाषण आता लीक झालं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO