बिहारमध्ये भाजपचा सुपडा साफ होणार? लोकसभा निवडणुकीपर्यंत नितीशकुमार यांची भीम रथ तयारी, गावोगावी OBC आरक्षण आणि कर्पूरी चर्चा
Karpoori Charcha and Bhim Rath | जातीचे सर्वेक्षण करून त्याची आकडेवारी जाहीर करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आता ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरत आहेत. ओबीसी समाजाची लोकसंख्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्यांना त्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे. एवढेच नव्हे तर जातीय आधारावर ध्रुवीकरण व्हावे आणि त्याचा फायदा होऊ शकेल, यासाठी लोकसभा निवडणुकीपर्यंत हा मुद्दा जिवंत ठेवायचा आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असून नितीशकुमार यांचे लक्ष पुढील सहा महिने ओबीसी आरक्षणावर असेल.
1 वर्षांपूर्वी