महत्वाच्या बातम्या
-
जम्मू-काश्मीर: दोन दहशतवाद्यांना अटक; कारमध्ये अतिरेक्यांसोबत पोलीस उपअधिक्षक सुद्धा सापडला
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसह जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्याच पोलीस उपअधिक्षकाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या या पोलीस उपअधिक्षकाला राष्ट्रपती पदक पुरस्कारानेही गौरवण्यात आलेलं आहे. देविंदर सिंह असं या पोलीस अधिक्षकाचं नाव असून ते एअरपोर्ट सिक्युरीटीसाठी तैनात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्यासाठी देविंदर सिंह मदत करत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे.
5 वर्षांपूर्वी -
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये बिगर काश्मिरी मजुर दहशतवाद्यांचे लक्ष; हल्ल्यांमध्ये वाढ
जम्मू-काश्मीर येथे लाल चौकात दहशतवादी हल्ला झाला. ग्रेनेडचा हल्ला करुन दहशतवाद्यांनी लाल चौकाला लक्ष्य केले. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य १२ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला श्रीनगरच्या हरि सिंह हाय स्ट्रीटवर केला.
5 वर्षांपूर्वी -
दहशतवाद संपविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा- युरोपियन युनियन शिष्टमंडळातील खासदार
जम्मू-काश्मीरमध्ये ‘कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात युरिपियन युनियनच्या २३ खासदारांचा एक गट भारताला पूर्ण पाठिंबा देईल, असं या खासदारांपैकी एकाने प्रसार माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं . मात्र यावेळी स्थानिक काश्मिरी माध्यम प्रतिनिधींनी समावेश घेतला नाही. दरम्यान, मंगळवारी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने लष्कराच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक आयोजित केली आणि त्यानंतर डाल सरोवर तलावाकडे जाण्यासाठी निघाले.
5 वर्षांपूर्वी -
कलम ३७०: घटनापीठापुढे ऑक्टोबरमध्ये सुनावणी
जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५ न्यायधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी घेण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान हा आदेश दिला. यावेळी याचिकाकर्त्यांपैकी एक, कम्युनिस्ट नेते (सीपीआयएम) सीताराम येचुरी यांना काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी भेटीगाठींव्यरिक्त इतर कोणत्याही हालचाली करू नयेत, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपवरून ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यात खडाजंगी
जम्मू-काश्मीरमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यात भाजपावरून बाचाबाची झाली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या आठवड्यात या दोन्ही नेत्यांना हरि निवास महल येथे येथे नजरकैदेत ठेवलं आहे. यादरम्यान भाजपाला जम्मू-काश्मिरात कोणी आणलं? यावरून दोघांमध्ये वादाला ठिणगी पडली आहे. दोघातील वाद ऐवढा विकोपाला गेला की अब्दुल्ला यांना तेथून अन्यत्र हलवण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हालचाली; ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत
रविवारी मध्यरात्रीपासून काश्मीरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तसेच नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या सगळ्या माजी मंत्र्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. तर राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली असून सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये व इतर संस्थांना आजपासून सुट्टी देण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून राज्यात जमावबंदीही लागू करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
बकरी ईदच्या दिवशी काश्मीरात पाकिस्तान व इसिसचे झेंडे - श्रीनगर
बकरी ईदच्या दिवशी काश्मीरात पाकिस्तान व इसिसचे झेंडे – श्रीनगर
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS