राज्यात निवडणुकीपूर्वी दंगलीची मालिका! MIM आणि भाजप नेत्यांचे चार्टर्ड विमान ते घरोब्याचे संबंध आणि औरंगजेब स्क्रिप्टची राजकीय चर्चा रंगली
Kolhapur Crisis | अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात मंगळवारी दोन गटात वाद झाला. संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यानंतर घरी परतत असताना संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आला. यामुळे बुधवारी कोल्हापुरात तणाव होता. आता गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत तणाव निर्माण झाला आहे.
2 वर्षांपूर्वी