Credit Score | तुम्हाला क्रेडिट स्कोअरमध्ये कसा सुधार करावा?, स्वस्त व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी महत्वाचे आहे
तुम्हाला जर तुमची आर्थिक क्षमता जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कसे कराल? तर आज आम्ही तुम्हाला सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर बद्दल माहिती देणार आहोत. क्रेडिट स्कोअर हा तुमच्या आर्थिक क्षमतेचे प्रतिबिंब आहे जी तुमची कर्ज घेण्याची क्षमता किती आहे हे दर्शवते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कोणते मोठे कर्ज घेताना (Loan Application) तुमचा क्रेडिट स्कोअर म्हणजे सिबिल स्कोअर महत्त्वाचा ठरतो. तुम्ही जेव्हा कर्ज घेण्यासाठी अर्ज करता तेव्हा, बँक क्रेडिट स्कोअरच्या म्हणजे सिबिल स्कोअरच्या आधारे तुमच्या कर्जाची पात्रता ठरवते. ज्यात तुमच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेचे आकलन केले जाते. क्रेडिट स्कोअरलाच सिबिल स्कोअर असे म्हणतात. तुमचे आर्थिक व्यवस्थापन आणि तुमची कर्ज फेडण्याची क्षमता किती मजबूत आहे हयांचे आकलन सिबिल स्कोअर वरून केले जाते.
2 वर्षांपूर्वी