Multibagger Stocks 2022 | 2022 मध्ये हे 37 शेअर्स 100 ते 250 टक्के परतावा देत पैसा वेगाने वाढवत आहेत, या स्टॉकची लिस्ट सेव्ह करा
Multibagger Stocks of 2022 | Sensex आणि Nifty मध्ये पडझड : 2022 मध्ये आतपर्यंत Sensex मध्ये 730 अंकांची म्हणजेच 1.26 टक्क्यांची घसरण झाली आहे. या दरम्यान, Sensex मधील 30 पैकी 17 शेअर्स लाल रंगात ट्रेड करत होते. Nifty मध्ये 229 अंकांची म्हणजेच 1.32 टक्के घसरण झाली असून 50 पैकी 27 शेअर्स लाल रंगात ट्रेड करत आहेत. BSE मिडकॅप इंडेक्समध्ये 1 टक्क्यांची घसरण झाली आहे, तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 3.5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. BSE500 निर्देशांकही 1 टक्क्यांपेक्षा थोडा जास्त घसरला आहे.
बँक शेअर्स वाढले, आयटी घसरले : 2022 या चालू वर्षाच्या 9 महिन्यांत बँक निर्देशांकांत 9 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आयटी निर्देशांक तब्बल 30 टक्क्यांनी खाली पडला आहे. FMCG निर्देशांकांत 17 टक्के वाढ झाली असून, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 9 टक्के वाढला आहे. PSU निर्देशांकांत 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ऑटो इंडेक्स निर्देशांकात 17 टक्क्यांची वाढ झाली असून, मेटल इंडेक्स 6 टक्के पडला आहे. ऑइल अँड बेस आणि पॉवर स्टॉक मध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे.
2 वर्षांपूर्वी