Linkedin Layoffs | तरुणांनो! नोकरी शोधून देणाऱ्या लिंक्डइनचे कर्मचारीच बेरोजगार झाले, म्हणून 'बजरंग बली की जय' राजकारणात अडकू नका
Linkedin Layoffs | लिंक्डइन कॉर्पोरेशन कंपनीने आपला व्यवसाय वाढविण्यासाठी ७१६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतरांना नोकरी देण्यात किंवा नोकरी शोधून देण्यात प्रसिद्ध असलेल्या कंपनीतील कर्मचारीच बेरोजगार झाले आहेत. याचे पडसाद भारतातही लवकरच उमटतील. कंपनीचे सीईओ रायन रोसलांस्की यांनी सोमवारी रात्री उशिरा ईमेलद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, कंपनीला पुढे नेण्यात या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. पण कंपनी व्यवस्थित चालावी म्हणून आम्ही ७१६ कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकत आहोत. यासोबतच कंपनीने आंतरराष्ट्रीय व्यापारातही (जीबीओ) बदल केले आहेत.
2 वर्षांपूर्वी