Loan in Cash Rule | हे माहिती आहे? कॅश मध्ये 20 हजारापेक्षा जास्त कर्ज देऊ किंवा घेऊ शकत नाही, इन्कमटॅक्स नियम काय?
Loan in Cash Rule | पॅन आणि आधार कार्डचा नवा नियम जारी करण्यात आला आहे. आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांचा रोख व्यवहार केल्यास पॅनकार्ड आणि आधार क्रमांकाची माहिती द्यावी लागेल, असं नव्या नियमात म्हटलं आहे. असे न करणाऱ्या व्यक्तीवर कर विभाग कारवाई करू शकतो. मात्र, रोखीने होणाऱ्या व्यवहारांबाबत कठोर नियम जारी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आयकर कायदा, १९६१ मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणतीही व्यक्ती कोणालाही 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोखीने कर्ज घेऊ शकत नाही किंवा देऊ शकत नाही. आयकर कायद्याच्या कलम 269SS मध्ये या नियमाचा उल्लेख आहे.
2 वर्षांपूर्वी