LIC Share Price | एलआयसी गुंतवणूकदारांचं प्रचंड नुकसान, पडझड थांबणार तरी कधी?, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या सविस्तर
LIC share Price | LIC ची IPO लिस्टिंग प्राईस 34 टक्क्यांनी पडली होती. त्यानंतर परकीय गुंतवणूकदारांनी केलेल्या भरघोस विक्रीमुळे शेअर बाजारात जबरदस्त पडझड सुरू झाली असून याचा परिणाम एलआयसीच्या स्टॉकवर देखील झाला आहे. एलआयसीच्या शेअर्सची स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग झाल्यापासून स्टॉक IPO इश्यू किमतीच्या जवळही गेला नाही. एलआयसीने 949 रुपये प्रति शेअर किमतीवर आपला आयपीओ बाजारात आणला होता. एलआयसीच्या शेअरची किंमत 34 टक्के खाली म्हणजेच जवळपास 628 रुपये वर ट्रेड करत आहे. सूचीबद्ध झाल्यापासून ते आतापर्यंत गुंतवणूकदारांचे जे नुकसान झाले आहे, त्याची आकडेवारी पाहिली तर असे दिसेल की, लोकांना प्रति शेअर 321 रुपये नुकसान सहन करावा लागत आहे.
2 वर्षांपूर्वी