LPG Cylinder Price Hiked | सामान्य लोकांचं आर्थिक वाट्टोळं थांबेना, घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर प्रचंड वाढवले
LPG Cylinder Price Hiked | महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक वाईट बातमी आणि आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आठ महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी महाग झाली आहे. 6 जुलै 2022 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर होते. तर व्यावसायिक सिलिंडरच्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५०.५० रुपयांनी वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी