Macfos IPO | ग्रे मार्केटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होण्यास सज्ज, तुम्ही या IPO मध्ये पैसे लावले?
Macfos IPO | ‘मॅकफॉस लिमिटेड’ या ई-कॉमर्स कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावण्याची मुदत आता संपली आहे. 21 फेब्रुवारी 2023 हा IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा शेवटचा दिवस होता. कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 96 ते 102 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. या कंपनीच्या आयपीओ शेअरने ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 76 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. GMP नुसार हा शेअर 178 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. 24 फेब्रुवारी 2023 रोजी या IPO शेअरचे वाटप केले जातील. स्टॉक 1 मार्च 2023 रोजी BSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध होईल. स्टॉक एक्सचेंज एसएमई इंडेक्समध्ये लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचे शेअर्स सूचीबद्ध होतात. ‘BigShare Services Private Limited’ फर्मला या IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)
2 वर्षांपूर्वी