महत्वाच्या बातम्या
-
शिंदे गटाच्या आमदारांची आमदारकी जाणार? सुप्रीम कोर्टाच्या निकालात प्रतोद आणि शिंदेंच्या गटनेतेपदाची निवड ही बेकायदेशीर असा स्पष्ट लेखी उल्लेख
Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला. ज्यामध्ये कोर्टाने शिंदे सरकार हे केवळ थोडक्यात बचावल्याचं समोर आलंय, परंतु सुप्रीम कोर्टाने निकालात बेकायदेशीर असा स्पष्ट लेखी उल्लेख करून शिंदे गटाला चक्रव्यूहात अडकल्याचे कायदेतज्ज्ञ अंतिम निकालाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर सांगत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
स्पीकरचा निर्णय चुकीचा, प्रतोद बेकायदेशीर, व्हीप बेकायदेशीर, राज्यपालांनी घटनेचं पालन केलं नाही, एवढं होऊनही शिंदे खुर्ची सोडणार नाहीत?
Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टामध्ये राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाचं वाचन पूर्ण झालं आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ४ मोठे धक्के देताना महत्वाच्या टिपण्या केल्या आहेत. शिंदे गटाचे भरत गोगावले यांची मुख्य प्रतोतपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट म्हटलं आहे. याचबरोबर आम्हीच खरी शिवसेना असा दावा कोणीही करू शकत नाही असंही यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. हा एकनाथ शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र कायदा आणि घटनेचं उल्लंघन असे सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढूनही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर खिळून बसणार का याची चर्चा सुरु झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टात 29 नोव्हेंबरला सुनावणी, तर शिंदे गट 2 दिवस आधी गुवाहाटीला, राजकीय भूकंपाचे संकेत? मोठी बातमी
Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगासंदर्भात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने वकिलांना या खटल्याचे लेखी स्वरूपात संकलन पूर्ण करण्यास सांगितले आणि चार आठवड्यांत मुख्य मुद्दे विचारात घेऊन ते लेखी स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्वाधिक धाकधूक शिंदे गटाची झाल्याची बातमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
केंद्रीय निवडणूक आयोगही सुनावणी घेऊ शकणार नाही | 25 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष
Maharashtra Political Crisis | शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
राज्यातील सत्तासंघर्ष आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे | 25 ऑगस्टला घटनापीठासमोर सुनावणी
शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
सरन्यायाधीश रमणा 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार | दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्ष सुनावणी प्रकरणी तारीख पे तारीख
आज (22 ऑगस्ट) ही सुनावणी पार पडणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी उद्या म्हणजे 23 ऑगस्टला होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता उद्या होणाऱ्या सुनावणींमध्येही महाराष्ट्रातील प्रकरण नाही. त्यामुळे ही सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेकडून याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
राज्यपाल याच दिवसाचा विचार करत होते. ही कायदेशीर कारवाई आहे. १६ आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात . ११ तारखेपर्यंत पेंडिंग असल्याने कोणताही निर्णय होऊ शकत नाही. या काळात काही बेकायदेशीर काम झालं तर आमच्याकडे या, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. राज्यपाल भवन आणि भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहेत. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागतील, आजही आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय
विधान परिषदेच्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ जून रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड केले. या बंडखोरीमुळे राज्यात आणि महाविकास आघाडीत प्रचंड उलथापालथ झाली आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहोत, असे सांगून एकनाथ शिंदे गट बाहेर पडला असल्याने सरकार तसेच शिवसेना पक्ष वाचवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. हिंदुत्वासाठी आम्ही पुढे आलो आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
New Labour Codes | तुम्ही 1 वर्ष नोकरी केल्यानंतरही मिळणार ग्रॅच्युइटीचे पैसे | पैशाचं गणित जाणून घ्या
केंद्र सरकार लवकरच देशात कामगार सुधारणांसाठी चार नवीन कामगार संहिता लागू करू शकते. हे कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन, रजा, पीएफ, ग्रॅच्युइटी यासह अनेक गोष्टी बदलणार आहेत. नव्या लेबर कोडमध्ये कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीमध्ये मोठा बदल झाल्याची चर्चा आहे. एखाद्या संस्थेत ग्रॅच्युइटीसाठी सतत ५ वर्षे काम करण्याचे बंधन सरकार काढून एक वर्ष करू शकते, असे मानले जाते.
3 वर्षांपूर्वी -
लेट करंट? | सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं त्याचा अर्थ उशिरा कळला? | शिंदे गटाचा मुक्काम 12 जुलैपर्यंत वाढला
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला हवा कारण सरकार अल्पमतात आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी ही मागणी केली आहे. जर तुमच्यासोबतचे ५१ आमदार गुवाहाटीला आले आहेत तर तुम्ही खुर्चीवर बसून कसे राहू शकता? तुमचं सरकार अल्पमतात आहे. महाराष्ट्राच्या या परंपरेत असं आधी कधी घडलेलं नाही.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे गट फ्लोअर टेस्टसाठी जाईल? | सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरू झाल्या तर थेट आमदार बरखास्तीची कारवाई सुरू होऊ शकते
२१ जूनला महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात मोठं बंड समोर आलं. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ३५ पेक्षा जास्त आमदारांचा गट घेऊन सुरतला गेले. ही बंडखोरी ही शिवसेनेतली सर्वात मोठी बंडखोरी आहे. शिंदे गटात आता ३९ शिवसेना आमदार आहेत तर १२ अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे बंडखोरी केलेल्या आमदारांची संख्या ५१ झाली आहे. आता बंडखोर आमदारांचा हा गट ठाकरे सरकारचा पाठिंबा काढण्याची तयारी करतो आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतामध्ये आलंय. या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं एकनाथ शिंदे गटानं जाहीर केलंय. शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी 38 आमदारांच्या गटानं सरकारचा पाठिंबा काढला असल्याचं शिंदे गटानं स्पष्ट केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास भाजपाचा पॉलिटिकल प्लॅन तयार
एकनाथ शिंदेंसह जवळपास ३८ ते ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानं राजकीय वादळ निर्माण झालं आहे. दिवसेंदिवस दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्या जात असल्याचं दिसत आहे. शिवसेनेनं १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केलीये. यावरूनच आता हे बंड सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यपाल राजभवनात दाखल | शिंदे समर्थकांना मुंबई विमानतळावर जमण्याच्या सुचना | राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत येणार
आज पवारांच्या निवासस्थानी आता मविआच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. शिंदे यांचं बंड थोपवण्यासह पुढे काय करायचं याबाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे. गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे यांचं बंड थोपवण्यात पवारांना यश येईल का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली
एकनाथ शिंदे आणि आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यात नवनव्या नाट्यमय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेचे अधिकाधिक आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेनं तब्बल १६ बंडखोर आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी पाऊल उचललं आहे. या आमदारांना नोटीस बजावण्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्षांनी घेतला असून, बंडखोर आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन