महत्वाच्या बातम्या
-
विधानसभा निवडणूक: ओपिनियन पोलचे हास्यास्पद अंदाज: सविस्तर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून, २१ तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र मागील काही वर्षांपासून मतदाराला प्रभावित करण्यासाठी हे प्रयोग खुलेआम पणे सुरु आहेत. ८-१० कोटी मतदारांच्या मनात आहे हे १९-२० हजार मतदारांना विचारून अंदाज व्यक्त केला जातो आहे. विशेष म्हणजे हे सॅम्पल्स नेमके कोणत्या विभागात आणि कोणत्या अमुक ठिकाणी घेतले गेले याचा कोणताही उल्लेख नाही.
5 वर्षांपूर्वी -
आमदारांची कुंडली २०१४: तुमच्या मतदारसंघातील आमदाराची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
२०१४ मध्ये झालेली विधानसभा निवडणुक राज्यातील राजकारणात एक ऐतिहासिक घटना होती. भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे सर्वच सहकारी पक्ष युती आघाड्या विसरून स्वबळावर निवडणूक लढले होते. त्यात तब्बल २५ वर्षं टिकलेली भाजप शिवसेना युती त्या निवडणुकीआधी तुटली होती.
5 वर्षांपूर्वी -
राज्य पोलीस भरती लेखी परीक्षेचा मोफत ऑनलाईन सराव थेट महाराष्ट्रनामा न्यूजवर
महाराष्ट्र पोलीस खात्याची मेगाभरती जाहीर झाली असून ३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर अशी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून तरुण-तरुणी सहभाग नोंदवतात. मात्र यंदा भरतीचा आकडा मोठा असून खाजगी नोकऱ्यांची कमी आणि ग्रामीण भागात रोजगाराचं साधन उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांचा मोठा सहभाग असेल पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केली; आज बाप्पाला निरोप देण्यात येणार
सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता, विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी १५ दिवसांपूर्वी संपूर्ण शहरात लगबग सुरू होती. घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या या बाप्पाची आराधना करताना १० दिवस कधी संपले, कळलेच नाही. शहरात साजऱ्या झालेल्या या आनंदोत्सवाची आज, गुरुवारी सांगता होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
१७ सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात राजकीय रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष यात्रा काढून पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. या यात्रेसोबतच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं तसंच पक्षांतराचं सत्र देखील सुरू आहे.त्यातच आता विधानसभा निवडणूकीसाठीची आचारसंहिता १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऐन नवरात्रौत्सवात लोकशाहीच्या या उत्सवाला सुरूवात होणार असल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
यू. पी. एस. मदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त
राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
धुळ्यात केमिकल कंपनीत स्फोट; ७ जणांचा मृत्यू
धुळेतील एका मोठ्या कंपनीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिरपूर जवळच्या एमआयडीसी कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या भीषण स्फोटात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच या कंपनीत ७० जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या स्फोटामुळे शिरपूरजवळील गावे हादरली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
5 वर्षांपूर्वी -
देश मंदिर-मशीद, कलम ३७० मध्ये गुंतला; तर रोजगारा अभावी तरुणाच्या आत्महत्यांकडे डोळेझाक
मागील काही दिवसांपासून एक बाजूला देशभर मंदिर मशीद आणि कलम ३७० वरून वातावरण पेटत ठेवण्यात आलं आहे. मात्र दुसऱ्याबाजूला सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला रोजगार आणि भूकमारी याकडे पूर्णपणे कानाडोळा केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. केवळ गावखेडयताच नव्हे तर शहरात देखील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद होत असल्याच्या कारणाने सुशिक्षित तरुण देखील मोठ्या संख्येने रोजच्या रोज बेरोजगार होतो आहे.
5 वर्षांपूर्वी -
सांगली-कोल्हापूर: सरकारी नोकरीच्या परीक्षा जवळ आल्या अन अभ्यासाची पुस्तकंच वाहून गेली
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तशीच सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्यास वेळ लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सांगली-कोल्हापूर: पुरग्रस्तांचे संसार, महत्वाची कागदपत्रं आणि मुलांची पुस्तकं सगळंच गेलं
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तशीच सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्यास वेळ लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूरकरांना दिलासा; मात्र सांगलीत अजूनही भीती कायम
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर, सांगलीला महापुर; जनजीवन विस्कळीत
कोल्हापूर : आठवड्याभरापासून कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि पात्राबाहेर वाहणाऱ्या नद्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर शहर-जिल्ह्यांची अवस्था बुधवारी आणखी भीषण केली. या दोन्ही शहरांना सोमवारपासून बसलेला महापुराचा विळखा बुधवारी आणखी आवळला गेला. हजारो बुडालेली घरे, पाण्याखाली गेलेले रस्ते-बाजारपेठा, ठप्प झालेले जनजीवन आणि मदतीसाठी सुरू असलेली विविध यंत्रणांची धडपड.. हेच विदारक चित्र या दोन्ही शहर- जिल्ह्य़ांमध्ये दिसत होते.
5 वर्षांपूर्वी -
पुणे भीषण अपघात व नियती; पहिल्या इयत्तेपासून वर्ग मित्र; एकत्रच आयुष्याचा अंत
आयुष्याच्या प्रवासात नियती कोणता खेळ खेळेल ते सांगता येणे कठीण आहे आणि तसाच काहीसा प्रकार पुणे येथील भीषण अपघातात घडला आहे. पुणे-सोलापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात तब्बल ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ८ जण यवतमधील जनविद्या विकास मंदिर या शाळेत २०१४ – १५ च्या १०वी’च्या बॅचमध्ये एकत्र शिकत होते. विशेष म्हणजे हे सर्व जण पहिल्या इयत्तेपासून जिवलग वर्ग मित्र होते.
6 वर्षांपूर्वी -
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला
दलित पँथरचे संस्थापक आणि ज्येष्ठ विचारवंत, तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते राजा ढाले यांचे आज राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. उद्या दि. १७ जुलैला दुपारी १२ च्या सुमारास ढाले यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवासस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथिल इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
औरंगाबादेत चोरट्यांनी चक्क एटीएम लंपास केलं
बीड : चोरटे नेमकं काय चोरी करतील याचा नेम नाही. यापूर्वी अनेकांनी एटीएम फोडून पैसे लुटण्याचे प्रकार केले आहेत. मात्र आता चोरट्यांनी कळसच गाठल्याचे दिसत आहे. हा प्रकार घडला आहे चक्क सर्वाधिक वर्दळीच्या बीड बायपासच्या दोन्ही बाजूने मोठी नागरी वसाहत आणि व्यापारी संकुल तसेच मंगल कार्यालय असलेल्या ठिकाणी.
6 वर्षांपूर्वी -
चिपळूण: तिवरे धरण फुटल्याने एक पूर्ण वाडीच वाहून गेली; २३ जण बेपत्ता
मागील ४ दिवस कोकणात देखील अतिवृष्टीने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे तेथील एक पूर्ण वाडी वाहून गेली असून संबंधित वाडीतील तब्बल २३ जण वाहून गेल्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे. वृत्त पसरताच मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी दोघांचे मृतदेह हाती लागल्याचे वृत्त आहे. धरणानजीकचा दादर पूल पाण्याखाली आला असून, ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांशी पूर्णतः संपर्क तुटला आहे. पावसाच्या प्रमाणाने मर्यादा गाठली तर संबंधित धरण फुटण्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे.
6 वर्षांपूर्वी -
बदल पहिलीपासूनच, गणिताच्या पुस्तकामध्ये सोपे ते स्वीकारले
इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये संख्या वाचनात केलेल्या बदलावरून वाद निर्माण झाला आहे. समाज माध्यमांवर यावरून मोठं मोठे विनोद होण्यास सुरुवात झाली आहे. काही शिक्षणतज्ज्ञ, लेखक, राजकीय नेत्यांनी हा बदल मराठी भाषेला अत्यंत मारक असल्याचे उघडपणे सांगितले आहे. दरम्यान संबंधित बदल करताना इंग्रजी भाषेचे अनुकरण केल्याचा थेट आरोप केला जात आहे. एकवीसला वीस एक म्हटल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील गोंधळ निर्माण होईल, असा दावा देखील अनेकांनी केला आहे. मात्र बालभारतीच्या गणित विषयतज्ज्ञ समितीच्या अध्यक्ष डॉ. मंगला नारळीकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संपुर्ण वादावर विस्तृतपणे मांडणी करून सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे ठामपणे सांगितले. त्यामुळे हा बदल नवीन नाही असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
जयघोषाने रायगड दुमदुमला! किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा
स्वराज्याची राजधानी रायगडात किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४६ वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. यानिमित्ताने शिवभक्तांनी दरवर्षीप्रमाणे हजारोंच्या संख्येने रायगडावर हजेरी लावली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पहाटेच रायगडावर हजेरी लावून महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. ते रोप वेने याठिकाणी दाखल झाले. विशेष म्हणजे यंदा शेतकरी बांधवांना अभिषेकचा मान देण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
बारावी निकालात मुलींची बाजी, कोकण टॉप, सरासरी निकाल ८५.८८ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. विभागनिहाय आकडेवारीत कोकण अव्वल स्थानी आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्यातील एकूणच निकालाची टक्केवारी ८५.८८ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलींचा हिंसाचार, १५ जवान शहीद
गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ मोठा भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात तब्बल १५ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी समस्त पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या