महत्वाच्या बातम्या
-
महिलांच्या वसतिगृहात पुरुष पोलीस आत कसे जातील? | तथ्यहीन वृत्तांमुळे पोलिसांची बदनामी
जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याच्या प्रकरणाची चौकशी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केली होती.
4 वर्षांपूर्वी -
80 वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीकडून 80 कोटी रुपयांचे वीज बिल
मुंबईच्या वसई परिसरात राहणाऱ्या 80 वर्षांच्या आजोबांना वीज कंपनीने 80 कोटी रुपयांचे बिल पाठवले. विशेष म्हणजे हे बिल केवळ 2 महिन्यांचे आहे. हे पाहून आजोबांचे ब्लड प्रेशर वाढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
भंडारा आग प्रकरण | 2 नर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल | हे आहे कारण....
9 जानेवारीला भंडारा जिल्हा हॉस्पिटलच्या न्यूबॉर्न केअर यूनिटमध्ये आग लागली होती. यात झालेल्या 10 नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी 2 नर्सविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिस स्टेशनमध्ये नर्स शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबिलढके यांच्या विरोधात IPC च्या कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगायोग? पूजाने ३ वर्ष भाजपसाठी काम | तर मृत्यूदिवशी इस्पितळात घेऊन जाणाऱ्यांमध्ये भाजप नगरसेवक
राजकीय वाद रंगलेला असताना पूजाच्या वडिलांनी देखील अजून खुलासे केले आहेत. पूजाच्या पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे”. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचंही ते म्हणाले आहेत. आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती, असंही त्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी | विरोधकांनाही समाजाची बदनामी थांबविण्याचा इशारा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना विरोधकांनी लक्ष केलं आहे. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केली असं सांगून याला जातीय वळण देखील देण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
अखेर संभाजी बिडीचं नाव बदललं | नवं नाव समोर आलं
संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर संभाजी बिडी कंपनीने आपल्या उत्पादनात संभाजी हे नाव वगळत असल्याचे जाहीर केले होते. कोल्हापुरात संभाजी नावाने बिडी बंडल विकले जात होते. आपल्या संपूर्ण आयुष्यात कधी काडीलाही हात न लावलेल्या संभाजी महाराजांचे नाव बिडीला देणे ब्रिगेडला नेहमीच खटकत होते.
4 वर्षांपूर्वी -
Good News | महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळणार
महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना आता सेवानिवृत्तीचा लाभ तात्काळ मिळणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस व लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे लाभाची रक्कम एकरकमी प्रदान करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नववर्षाचे स्वागत घरातूनच करा | या आहेत ३१ डिसेंबरसाठी गाइडलाइन्स
कोरोना संकटानं ग्रासलेलं २०२० वर्ष आता शेवटच्या औटघटका मोजत आहे. दोन दिवसांत हे वर्ष निरोप घेईल आणि नव्या वर्षाचा उदय होईल. भीती, निराशा, दुःखाने व्यापून गेलेल्या या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. नव्या वर्षात मुंबई पुन्हा एकदा पूर्वीसारखी सुसाट धावेल, या आशेत मुंबईकरही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आतूर झाले आहेत. मात्र, करोनाचं संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाही, याची जाणीव करून देत मुंबई पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांनी हत्येचा प्रयत्न केल्याची नोंद या गुन्ह्यात आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड लागू
राज्य सरकारनं सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला आहे आणि त्यामुळेच आता सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार झाले आहे. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे याचं एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारनं काढलंय. ज्यामध्ये ड्रेस कसा असावा, कुणी कुठले कपडे घालावे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी (Sheetal Amte) यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आणि सर्वत्र धक्कादायक बातमी पसरली. त्यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. डॉ. शीतल यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबातील डॉ. दिगंत आमटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या अतिशय धक्कादायक आणि अनपेक्षित आहे,” असं डॉ. दिगंत म्हणाले. डॉ. दिगंत हे प्रकाश आमटे यांचे चिरंजीव आणि डॉ.शीतल आमटे यांचे चुलत भाऊ आहेत.
4 वर्षांपूर्वी -
न्यायालयाने समज देऊनही पुन्हा ट्विट | म्हणाली या सरकारपेक्षा बॉलीवूड माफिया, हृतिक रोशन बरे
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर (Bollywood Actress Kangana Ranaut Mumbai Office) मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला होता. कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. काल कोर्टाने या याचिकेवर आपला निकाल दिला होता. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लस येईपर्यंत शाळा-कॉलेज बंद ठेवा | 10वी, 12वी परीक्षांचा पॅटर्न बदला
मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत संसर्ग लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांप्रमाणे, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच ठेवण्यात येतील. खरंतर,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आयुक्तांच्या आदेशांनुसार मुंबईत या वर्षाअखेरपर्यंत शाळा बंदच राहतील.
4 वर्षांपूर्वी -
आगामी वर्षात सिडको जाहीर करणार 65 हजार घरांसाठी विक्रमी सोडत
प्रधानमंत्री आवास योजनेतील (Pradhan Mantri Awas Yojana) ‘सर्वांसाठी घर’ या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने सिडको (CIDCO Housing) कडून लाखो घरं उभारण्यात येणार आहेत. मुंबई, नवी मुंबई मध्ये अनेक ठिकाणी त्यासाठी काम सुरू आहे. दरम्यान सिडको नववर्षामध्ये पहिल्या टप्प्यात तब्बल 65,००० घरांची एकत्र सोडत जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात सोडत जाहीर करण्याची ही पहिलीच असल्याने अनेक सर्वसमान्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्कांचं घर घेण्यासाठी पर्याय खुला होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | सिनेमागृहांचा पडदा उद्यापासून उघडणार | राज्य सरकारचा निर्णय
अनलॉक ५ ची सुरुवात होऊन अनेक गोष्टी हळूहळू सामान्य लोकांसाठी खुली होतं आहेत. लॉकडाऊन मधून राज्य पूर्णपणे बाहेर येण्याच्या जवळ येऊन ठेपलं आहे. मागील काही दिवसात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रातील तब्बल ७ महिन्यांपासून बंद असलेली सिनेमागृह उद्यापासून खुली करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्या म्हणजे गुरुवारपासून राज्यातील सिनेमागृह तसेच नाट्यगृह सुरू करण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. तसेच इतर निर्णय देखील घेण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कांद्याच्या दरांनी रडवल्यानंतर आता मिरचीने सर्वसामान्य जनतेला ठसका बसणार
काही दिवसांपूर्वी कांद्याने सामान्य ग्राहकांच्या डोळयात पाणी आणल्याचं पाहायला मिळालं. रोजचा प्रपंच चालावं देखील गृहिणींना कठीण झालं होतं. संपूर्ण किचनचा बजेटच बिघडल्याने गृहिणी देखील संताप व्यक्त करत होत्या.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO | आईसोबत बसलेल्या ३ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेलं | आईने...
नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गावाअंतर्गत पानतास वाडी शिवारात तारकनाथ वस्तीवरील सार्थक बुधवंत या ३ वर्षाच्या मुलाला बिबट्याने आईच्या हातातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यात गेल्या १५ दिवसातील ही तिसरी घटना असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
परतीच्या पावसाने सामान्यांच्या डोळ्यात पाणी येणार | कांदा शंभरी गाठणार
परतीच्या पावसाचा जसा शेतकऱ्यांना फटका बसला, तसाच सर्वसामान्य ग्राहकांनाही बसायला सुरुवात झाली आहे. भाजी बाजारातील दरवाढीची झलक दाखवायला कांद्याने सुरुवात केलीय. काही आठवड्यांपूर्वी २० ते २५ रुपये किलो दराने कांदा मिळत होता. मात्र सध्या कांद्याचे दर तब्बल ७० रुपयांच्या घरात पोहोचलेत. राज्यातील कांद्याची परिस्थिती पाहता येत्या काही दिवसांत कांद्याने शंभरी गाठली, तरी आश्चर्य वाटून घेऊ नका, असं राज्यातले अनुभवी व्यापारी सांगतायत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यू
राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि कोकण या तीन विभागांना गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत ४८ जणांना प्राणास मुकावे लागले आहे तर लाखो हेक्टवरील हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली आहेत. शेतकऱ्यावर झालेला हा मोठा आघात असून शासनाच्या मदतीकडे सारेच आस लावून बसले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिन्ही विभागांतील स्थितीचा आढावा घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
वोडाफोन-आयडिया नेटवर्कच्या कांड्या गुल | लाखो ग्राहक नाॅट रिचेबल
देशातील आघाडीची मोबाईल सेवा पुरवठादार असलेल्या वोडाफोन-आयडियाचे मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ढेपाळले आहे. पुण्यात झालेल्या तांत्रिक बिघाडाने राज्याच्या निम्म्याहून जास्त सर्कलमध्ये ग्राहकांना Vi च्या कनेक्टिव्हिटी फेल्युअरचा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या या ढिसाळ कारभारावर ग्राहकांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL