महत्वाच्या बातम्या
-
कोकणात चक्रीवादळाने आंबा, फणस, सुपारीच्या झाडांचं प्रचंड नुकसान
निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात झालेले नुकसान पाहता आपण भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या पॅकेजची मागणी करणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये वादळाने पोल्ट्री फार्मचे प्रचंड नुकसान, कोंबड्या उघड्यावर
निसर्ग चक्रिवादळामुळे राज्यातील विविध ठीकाणी अनेक नुकसान झाले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात ४ जण जखमी झाले आहेत. या पार्श्र्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत २ दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
चक्रीवादळ: रायगड प्रशासनाने तब्बल १३,५४१ लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
सकाळी दहा वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोरही वाढला. यानंतर किनारपट्टीवरील भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले. मरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या.
5 वर्षांपूर्वी -
रत्नागिरी- भगवती बंदरात जोरदार लाटांमुळे जहाज भरकटले
निसर्ग’ चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळापूर्वी कोकण, मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रावर फेसाळलेल्या लाटांमध्ये जहाज भरकटले होते. जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने खवळलेल्या समुद्राशी जहाजाची झुंज सुरू होती.
5 वर्षांपूर्वी -
चक्रीवादळाचा मुंबई, ठाणे आणि रायगडला तडाखा बसणार; हवामान विभागाचा अंदाज
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘निसर्ग’ चक्रीवादळ ताशी ११० कि.मी वेगाने दुपारी एक नंतर अलिबागला धडकणार
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे.
5 वर्षांपूर्वी -
सीबीएसई, आयसीएसई शाळांत यंदापासूनच मराठी अनिवार्य : राज्य सरकारचा आदेश
महाविकास आघाडीने सरकारने सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज यासह अन्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करणारा आदेश आज लागू केला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तो जाहीर केला. राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
IFSC वाद: केंद्र सरकारच्या हेतूचे विश्लेषण होण्याची गरज - उद्योगमंत्री
देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच आयएफएससीचं मुख्यालय गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं असून याबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारास येत आहे. त्यातच आता आयएफएससीचं मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...आज त्या घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ आज साधेपणानेच साजरा होत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली.
5 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण; संपर्कातील ९ जण सुद्धा ताब्यात
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील ३४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये मुंबईतील १४ रुग्ण, पुण्यातील १५, नागपूरमधील १, औरंगाबाद १, यवतमाळमधील ३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९६ वर गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज यांचं विधान सत्य ठरलं; पोलिसांच्या छाप्यात मशिदीतून ११ तुर्कस्तानी मौलवी ताब्यात
एकाबाजूला देशात कोरोना आपत्तीने धुमाकूळ घातलेला असताना आणि पोलीस यंत्रणा देखील त्यात व्यस्त असताना राज्यातील इतर काही घटना पोलीस व्यवस्थेचा ताण वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात. सध्या राज्यातील प्रत्येक कोपऱ्यात पोलीस रस्त्यावर पहारा देत असून, लॉकडाउन असल्याने लोकांच्या संबंधित घटनांकडे देखील लक्ष ठेवून आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांच्यासाठी थाळ्या-घंटानाद केला; त्यांच्यावरच फिल्मी देशभक्तांकडून घर खाली करण्यासाठी दबाव
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका वाढतोच आहे. दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णांची संख्याही वाढून १२५ झाली आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी नवी मुंबईत एकीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या राज्यात ५ झाली आहे. सकाळी वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात सर्वाधिक चिंताजनक स्थिती असताना डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलीस यंत्रणा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कर्तव्यावर हजारोंशी संपर्क; वनरुम'च्या घरात बाबा चिमुकल्यांना लांब ठेऊन जेवतो अन पुन्हा..
देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, तर या आजारात ११ जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात १२२ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; राज्यात एकूण १२४ रुग्ण
महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात झालेला महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ४ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे आज पुन्हा दोन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रभर पसरतोय कोरोना; रुग्णांची संख्या १२२ वर पोहोचली
राज्यात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं असून, रुग्णांची संख्यादेखील ११६वरून १२२वर गेली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधित आढळून आले आहेत. मुंबईतल्या ४ जणांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मुंबईत नव्याने ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण असे सहा रुग्ण आढळून आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लॉकडाउन असताना फिरणाऱ्या दुचाकी स्वाराने पोलिसावर गाडी घातली
कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. दररोज नवीन रुग्णांची यात भर पडत आहे. देशभरात लॉकडाउन जाहीर झालं आहे. पोलीस आपला जीव धोक्यात घालून लोकांना घरात राहण्यास सांगत आहे. पण, वसईमध्ये एका तरुणाने पोलिसांवरच गाडी घालून जखमी केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर...तर १४ सदस्य डिस्चार्जच्या प्रक्रियेत
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर गेला आहे. बुधवारी सकाळी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील पाच जण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अवघ्या काही तासांत मुंबईत आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
5 वर्षांपूर्वी -
शुभ गुढीपाडवा; राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज
पुण्यातील पहिल्या दोन रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. दोंघाचे १४ दिवसानंतर सलग दोनदा घेतलेले सँपल निगेटिव्ह आले आहेत. या दाम्पत्याला ९ मार्च रोजी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचे महाराष्ट्रात सापडलेले हे पहिले रुग्ण आहेत. दुबई प्रवास करून आल्यानंतर त्यांना लक्षणं आढळली होती.
5 वर्षांपूर्वी -
देश लॉकडाऊन; पण मुख्यमंत्री आदित्यनाथांनी गर्दीसह देवीचं दर्शन घेतलं
देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यावाचून कोणताही पर्याय नाही. त्यामुळेच मंगळवारी मध्यरात्रीपासून घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. २१ दिवस हे निर्बंध लागू असतील. देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये त्यांनी ही घोषणा केली.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी केंद्राचा निधी, लस, हॉस्पिटल, औषधावर बोला; टाळ्या-थाळ्या नको..प्लिज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ट्विट करत सांगितले की, ‘कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात देशवासियांना काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. २४ मार्चला रात्री ८ वाजता मी देशाला संबोधित करेल.’, तर, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी देशाला संबोधित करत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला जनतेने चांगला प्रतिसाद दिला होता.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Power Share Price | 3,044 टक्के परतावा देणाऱ्या शेअरबाबत अपडेट, मजबूत परताव्याचे संकेत - NSE: RPOWER
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN