महत्वाच्या बातम्या
-
मुंबईतील दोघांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या दोघांच्या चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या असून राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा ७ वर पोहचला आहे. राज्यात दुबईहून परतलेल्या पुण्यातील कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच कुटुंबियांच्या विमानातून मुंबईत आढळलेल्या रुग्णांनी प्रवास केला होता. या रुग्णांवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे 'घे डबल' नेते म्हणतात, कोरोनाच्या रुग्णांवर तपकीर म्हणजे औषध
जुन्या काळात ग्रामीण भागातील महिला व पुरुष तपकीर ओढायच्या. तपकीरीला उग्र वास असतो. त्यामुळे करोनासारखा व्हायरसही तेथे राहू शकत नाही. करोनाच्या लागण झालेल्या रुग्णांचा या तपकीरीचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो का याचा अभ्यास करावा, असे आवाहन श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील 'त्या' प्रवाशांना कोरोनाची बाधा नाही - आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोन दिवसांत ५ वर पोहचली आहे. पुण्यातील दुबईहून परतलेल्या एकाच कुटुंबियांतील तिघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील कोरोनाचा धक्कादायक आकडा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (आज) बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण; महापालिकेकडून २०० खाटांचं रुग्णालंय सज्ज
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला असून पुण्यात दोन रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनाही नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. करोना कक्षात त्यांना ठेवण्यात आलं आहे. दरम्यान करोनाचे रुग्ण आढळल्याने शहरात चिंतेंचं वातावरण असून पूर्वकाळजी म्हणून आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची सूचना देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बेळगाव सीमाप्रश्नी १७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमाप्रश्नावर येत्या १७ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील व्हावा, या मागणीसाठी हा खटला दाखल करण्यात आला होता. २००४ पासून हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दीड वर्षांपूर्वी या प्रकरणाची अखेरची सुनावणी झाली होती. त्यामुळे १७ मार्चला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात प्रशासकीय व्यवस्थेत तब्बल २ लाख पदे रिक्त; पण भरणार किती?
राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय व्यवस्थेमध्ये तब्बल २ लाख १९३ पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात रिक्त पदांची माहिती मागविली होती. त्यांना राज्य सरकारने शनिवार ७ मार्च रोजी इ-मेलद्वारे ही माहिती दिली. या माहितीत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतची रिक्त पदांचा तपशीलवार देण्यात आलाय.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लागण महाराष्ट्रातही, नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण
भारतात कोरोनाव्हायरसने पुन्हा शिरकाव केल्यानंतर आता महाराष्ट्रालाही कोरोनाचा धोका आहे. नवी दिल्ली, तेलंगणा, राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही कोरोनाव्हायरसचा संशयित रुग्ण सापडला आहे. मंगळवारी नाशिकमध्ये हा संशयित रुग्ण आढळून आला. नाशिकमध्ये एका व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून आलीत. त्याला विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. आता तिथल्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
5 वर्षांपूर्वी -
संधी!..तुम्ही कथा, लघुकथा, कविता, चारोळ्या, भयकथा व बरंच काही लिहिता? आम्ही प्रसिद्ध करू
महाराष्ट्रनामा न्यूज देशभरातील मराठी लेखकांसाठी त्यांच्या आवडीच्या विषयावर लेख लिहिण्याची मोफत संधी देत आहे. लवकरच या सेक्शनचे अधिकृतपणे लॉंचिंग होणार आहे. तुम्ही तुमची आजवरची खालील नमूद केलेल्या सर्व विषयावरील लेखन तसेच भविष्यातील लेखन महाराष्ट्रनामा न्यूज’वर प्रकाशित करू शकता आणि जगासमोर स्वतःची ओळख निर्माण करू शकता.
5 वर्षांपूर्वी -
इयत्ता पहिली ते दहावी मराठी अनिवार्य; सर्व मंडळांच्या शाळांना कायदा लागू
आज ‘मराठी भाषा दिन’, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
5 वर्षांपूर्वी -
आज मराठी भाषा दिन; गर्व आहे मराठी असल्याचा
मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जात असतो. या दिवसाचं औचित्य साधत राज्यात मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: भोंदू बाबाकडून ५ बहिणींचं लैंगिक शोषण, पूजेच्या नावाखाली मुलींना नग्न करायचा
अघोरी प्रथा आणि जादूटोणाकरून पैसे उकळण्याचे आणि महिला अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. पुजेच्या नावाखाळी महिलांवर अत्याचार करणाऱ्या एका भोंदू बाबाला पोलिसांनी ताब्यात धेतलं आहे. महिलांना नग्न करून त्यांच्या शरीरावर लिंबू पिळून चोळणं असं धक्कादायक प्रकार तो करायचे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यभरातील १,५७० ग्रामपंचायतींसाठी २९ मार्चला मतदान
राज्यभरातील १९ जिल्ह्यांमधील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी ३० मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
इंदुरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून टीकेची झोड उडाली होती.
5 वर्षांपूर्वी -
महापोर्टल अखेर बंद; सरकारच्या वतीनं आज परीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे
परीक्षार्थींकडून त्रुटींबाबत वारंवार आलेल्या तक्रारींमुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं महापोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे सरकारी नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता त्यासंबंधीचं परीपत्रक आज सरकारच्या वतीनं काढण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
इंदोरीकर महाराजांकडून तमाम महिलावर्गाची दिलगिरी व्यक्त
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती.
5 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा असताना सुद्धा तृप्ती देसाई नगरला? स्टंट असल्याचा समर्थकांचा आरोप
स्त्रीसंग समतिथीला केला तर मुलगा आणि विषमतिथीला केला तर मुलगी होते, असे वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बेस्ट ऑफ लक: आजपासून बारावीची परीक्षा
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (१८ फेब्रुवारी) सुरु होत आहे. राज्यातील एकूण ३०३६ परीक्षा केंद्रांवर १८ फेब्रुवारी ते १८ मार्च असा एक महिना बारावीची परीक्षा होणार आहे. राज्यभरातून १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे ५ लाख ८५ हजार ७३६ विद्यार्थी, कला शाखेचे ४ लाख ७५ हजार ७८४ विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रमचे ५७ हजार ३७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
२ तासांच्या भाषणात एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो: मंत्री बच्चू कडू
‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य एका कीर्तनात केल्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. यासंबंधी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: पेट्रोल फेकून महिलेला ४ जणांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका महिलेवर पेट्रोल फेकून काही अज्ञात हल्लेखोरांनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तात व्यस्त पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिलांचा अपमान झाला आता इंदुरीकर महाराजांकडून शिक्षकांची खिल्ली
अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये शिक्षक वर्गात येऊन वेळ कसा वाया घालवतात? हे सांगत त्यांनी शिक्षकांवर टीका केली आहे. त्यामुळे आता शिक्षक संघटना इंदुरीकर महाराजांवर नाराज झाल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA