महत्वाच्या बातम्या
-
राज्यात ७२,००० पदांची महाभरती; भरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे होणार नाही
महाराष्ट्र सरकारकडून विविध विभागातील तब्बल ७२ हजार पदांच्या महाभरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे ही मेगाभरती प्रक्रिया महापोर्टलद्वारे पार पडणार नसल्याचं निश्चित झालं आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोर्टलबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय ऑनलाईन मागविण्यात आले होते. त्यानंतर जवळपास ८५ टक्के विद्यार्थ्यांनी महापोर्टल बंद करावे, अशी जोरदार मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचेही वृत्त आहे. मात्र, यावर सरकारने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; १० जणांवर गुन्हा दाखल
हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरला नसतानाच सोलापूर इथं एक भयंकर प्रकार समोर आला आहे. सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO- नको ते कीर्तन! इंदुरीकर महाराजांवर किर्तनामुळे गुन्हा दाखल होणार
अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ओझर येथे झालेल्या किर्तनात ” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य केलं होते. इंदोरीकर महाराज यांनी केलेले वक्तव्य हे गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात आहे. हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
अभिनेते सयाजी शिंदेंच्या पुढाकाराने बीडमध्ये रंगणार पहिले ‘वृक्षसंमेलन’
सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची संकल्पना आणि वन विभागाच्या सहकार्याने पालवनच्या उजाळ माळराणावर फुललेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर जगातील पहिले वृक्ष संमेलन १३ व १४ फेब्रुवारी २०२० रोजी होत आहे. पर्यावरण आणि निसर्गप्रेमी असेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत हे संमेलन होत असून पालकमंत्री धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पर्यावरण प्रेमींसाठी अनोखी मेजवाणी असलेल्या या वृक्ष संमेलनास विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींनी मोठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, कृषीभूषण शिवराम घोडके यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून कुटुंबाची आत्महत्या
मुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने आत्महत्या केली आहे. गडचिरोलीतील आनंद नगर याठिकाणी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी या तिघांची नावं आहे. या तिघांनीही त्यांच्या घरामागे असलेल्या शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी ११.३० च्या सुमारास यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शनिवारी मुलीने आंतरजातीय विवाह केला. त्यानंतर या तिघांनीही आत्महत्या केली.
5 वर्षांपूर्वी -
हिंगणघाट: पीडितेचा जीवनाशी संघर्ष थाबंला; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तिच्या मूळ गावात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
5 वर्षांपूर्वी -
ज्या वेदना मुलीला झाल्या त्याच वेदना आरोपीला झाल्या पाहिजेत; पीडितेच्या वडिलांची मागणी
माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी ६.५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी ७.४० मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
हिंगणघाटमधील पीडित तरुणीचा अखेर मृत्यू
माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी ६.५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी ७.४० मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
लॉजवरील पोलिस धाडीत तब्बल १३ कॉलेज जोडपी ताब्यात; पालक धास्तावले
चंद्रपुर इथे नागपूर महामार्गावरील जनता चौक इथल्या रेणुका गेस्ट हाऊसमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याची माहिती स्थानिक रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, स्थानिक पोलिसांनी कारवाई केली, तेव्हा रेणुका गेस्ट हाऊसच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकूण १३ महाविद्यालयीन जोडपी आढळून आली. या सर्व जोडप्यांना रामनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गेस्ट हाऊस मालक आणि त्याचा साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
विकृतांमुळे लेकीचं जगणं असह्य! सिल्लोडमध्ये घरात घुसून महिलेला पेटवलं
महिलेवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आरोपी संतोष सखाराम मोहिते याला मंगळवारी (४ फेब्रुवारी) अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (१० फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
माणसाकडे माणूस म्हणून न पाहता ‘वस्तू’ म्हणून बघितलं जाऊ लागल्याने ते घडतं आहे
नंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.
5 वर्षांपूर्वी -
वर्धा: त्या आरोपीला सुद्धा जाळून टाका, न्याय द्या; स्थानिकांची घोषणाबाजी
नंदोरी मार्गावरील एका दुकानासमोर एका माथेफिरुने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना काल घडली. ही तरुणी मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती, ती काल नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना एक युवक पाठीमागून दुचाकी वर आला, त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले आणि त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता, त्याने मुलीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तिथून पळ काढला.
5 वर्षांपूर्वी -
सरकारकडून गडकिल्ल्यांवर मद्यपान करण्यास बंदी; शिक्षेची तरतूद
महाराष्ट्रात ३५० हून अधिक गडकिल्ले हे इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. या गडकिल्ल्यांना निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेलं आहे. या गडकिल्ल्यांवर अनेक तरुण तरुणी जात असतात. पण त्यापैकी काही इतिहास समजून न घेता केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी गडकिल्ल्यांवर जातात. त्या ठिकाणी जाऊन दारुच्या पार्ट्या करत हुल्लडबाजी करतात. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत असल्याने अनिल देशमुख यांनी गडकिल्ल्यांवर दारु पिणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अशाप्रकारे हुल्लडबाजी करणाऱ्यांना सश्रम कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात येणार असल्याच म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर: हाणामाऱ्या ऐकल्या आता विरोधक नगरसेवकाने घेतला सत्ताधारी नगरसेवकाचा मुका
राज्यभरात अनेक महापालिकांमधील सर्वसाधारण सभा या हाणामारी आणि बाचाबाचीने गाजल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. परंतु, तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणाने गाजली. महापालिकेत एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाची चक्क भर सभागृहात करकचून पप्पी घेतली. महापालिकेची सभा सुरु असताना भर सभागृहात विरोधीगटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची पप्पी घेतल्याने सर्वजण अवाक् झाले.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा शिका; राज्यपालांचा मनसे बाणा
मराठी भाषेबद्दल राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही राहिली आहे. राज्यात राहणाऱ्या परप्रांतीयांनीं देखील मराठी भाषा शिकलीच पाहिजे हे मनसेचा नेहमीच आग्रह राहिला आहे. इतर भाषिकांच्या कार्यक्रमात देखील मनसे अध्यक्षांनी मराठी भाषेच महत्व मांडलं आहे. त्यामुळे मनसे नेहमीच परप्रांतीय लोंढ्यांच्या नजरेत खुपली आहे. मराठी बद्दलची कोणतीही भूमिका मनसेच्या नेत्यांनी मांडताच त्यावर बातम्या बनतात, मात्र मनसे व्यतिरिक्त एखादी महत्वाची व्यक्ती मराठीचा आग्रह मांडते, तेव्हा मात्र ती भुमीका अत्यंत सौम्य पणे घेतली जाते.
5 वर्षांपूर्वी -
चाबूक! म्हणत खवय्ये सुखावले, कोल्हापूरकरांच्या ताटात मटण
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा या उपनगरात मटण दरवाढीचा मुद्दा उपस्थित झाला. येथेच या वादाची पहिली ठिणगी पडली. या परिसरातील मटण विक्रेत्यांनी ५६० ते ५८० रुपये किलो दराने विक्री सुरू केली. त्यानंतर येथील दुकाने बंद पडू लागली. मात्र, नदीपलिकडे मटण ४६० किलोने मिळत असताना गावात मात्र मटण विक्रेते आर्थिक लूट करत असल्याचा आक्षेप लोकांनी घेतला. हे आंदोलन इतर ठिकाणीही पसरू लागले. मटण विक्री बंद असल्याने कोल्हापूरकर ताटातील झणझणीत मटणाला वंचित झाले होते. मात्र, कृती समितीने यावर तोडगा काढल्याने अखेर आजपासून मटण विक्री सुरू होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
संत साहित्यावरील परिसंवादाला विरोध; तिघे पोलिसांच्या ताब्यात
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजच्या दुसऱ्या दिवशी वादाचे गालबोट लागले. संत साहित्य आणि बुवाबाजी या विषयावरील परिसंवादात हा वाद उफाळून आला. संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
सुजाण माणसे कशाला हिटलरच्या मागे जातील? अरुणा ढेरेंचं मत
‘जर एखाद्याने वेगळी भूमिका घेतली की लगेच त्याने एका विचारधारेचा झेंडा हातात घेतलाय, असं होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्वजण सुजाण नागरिक आहेत,’ असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी JNU मधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं वक्तव्य केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
'सारथी'च्या बचावासाठी खासदार छत्रपती संभाजीराजेंचं पुण्यात उपोषण
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्वायत्तता अबाधित ठेवावी, यांसह विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांनी आगरकर रस्त्यावरच ठिय्या देत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या वेळी सारथीला मोठ्या प्रमाणात निधी द्या, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर कारवाई करा, असे फलकही आंदोलकांनी झळकविले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेही उपोषणाला बसलेत.
5 वर्षांपूर्वी -
साहित्य संमेलनाला जाऊ नका; ब्राह्मण महासंघाने महानोरांना दिली धमकी
उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ब्राह्मण महासंघाने संमेलनाचे उद्घाटक कविवर्य ना. धों. महानोर यांना दिली आहे. ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ शुक्रवार १० जानेवारी पासून होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या धमकीमुळे आयोजक चिंतेत आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यापासून हे संमेलन वादात सापडले आहे. दरम्यान, संमेलनाला जाऊ नये अशी फोनवरून धमकी मिळाल्यानंतरही ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर उपस्थित राहणार आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS