महत्वाच्या बातम्या
-
BREAKING | मंत्रिमंडळाने दिलेला प्रस्ताव राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेऊ शकत नाहीत - हायकोर्ट
विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतचा वाद कोर्टाने निकाली काढला आहे. “या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नाहीत. राज्यपालांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे”, असं हायकोर्टाने नमूद केलं.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदाराची पदाधिकारी मेळाव्यात थेट राष्ट्रवादीला बुडवण्याची भाषा | वाद अजुन पेटणार?
महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं आमदार-मंत्री, पक्षातील नेते मंडळी दाखवतात. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चित्र वेगळं आहे. कारण परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या एका स्फोटक व्हिडीओ क्लिपने राष्ट्रवादी-शिवसेनेतला संघर्ष अधोरेकित झालाय. एका मेळाव्यात खासदार संजय जाधव बोलत असताना ते राष्ट्रवादीवर असे काही घसरले की त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बाप काढला. एवढ्यावरच ते शांत बसले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बुडविण्याची भाषा केली.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव | राज्य मागासवर्ग आयोगाचा मोठा निर्णय
मागील काही दिवसांपासून राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आले होते. एका बाजूला मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे राजकीय ओबीसी आरक्षणावरून देखील सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळाचा प्रस्ताव परत पाठवता येत नाही अन् फेटाळताही येत नाही | त्यात हायकोर्टाचे ताशेरे | राज्यपालांची कोंडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली आहे. यात राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे. तर काँग्रेसचे रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर आणि शिवसेनेकडून ऊर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन पाटील यांच्या नावांची शिफारस आहे.
4 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नियुक्तीविषयी भूमिका मांडा | हायकोर्टाचे केंद्राला निर्देश
राज्यपालांनी हेवेदावे विसरून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नामनियुक्त सदस्यांची नेमणूक करावी असे राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात सांगण्यात आले. विधान परिषदेच्या नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी 12 नावे राज्य सरकारकडून राज्यपालांना पाठविण्यात आली आहेत. ही नावे पाठवून आठ महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. तरीही अद्याप सदस्यांची नियुक्ती झाली नाही. म्हणून राज्य सरकारच्या वतीने हाय कोर्टात बाजू मांडण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
अजित पवार आणि अनिल परबांविरुद्ध CBI चौकशी करण्याची मागणी | कोर्टात याचिका दाखल
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची नावे आपल्या जबाबात घेतली असून या दोघांवर गुन्हा दाखल करून, CBI कडे चौकशी करण्याची मागणी अॅड. रत्नाकर डावरे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पावसाळी अधिवेशनात OBC ते मराठा आरक्षणसहित 9 विधेयके दोन्ही सभागृहांकडून मंजूर - मुख्यमंत्री
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात 9 विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार
ओबीसी आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेले आहे. दरम्यान भाजप आणि राज्य सरकारमध्ये या विषयावरुन प्रचंड वाद होत आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने कोरोना काळ पाहता निवडणुका घेण्याबद्दलचा अधिकार निवडणूक आयोगावर सोपवला आहे. यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
सेना-भाजप एकत्र येण्याच्या राजकीय पुड्या | राणेंना मंत्रिमंडळात स्थान हे सेना-भाजप ४ वर्ष तरी एकत्र येणार नसल्याचे संकेत? - सविस्तर वृत्त
मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जेवढी चर्चा महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा जास्त चर्चा ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला टाळलेल्या पत्रकार परिषदेमुळे तर चर्चेला आणखीनच उधान आलंय. एकाबाजूला जे बिहारमध्ये महागठबंधनचं झालं तेच महाराष्ट्रात महाआघाडीचं होणार अशी वृत्त पसरवली जातं आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन ही लोकशाहीची हत्या? | फडणवीस सरकारचा विक्रम १९ आमदारांच्या निलंबनाचा - सविस्तर वृत्त
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप आज आक्रमक झालेला आहे. राज्यभर भाजपचं आंदोलन सुरु आहे तर विधिमंडळाच्या आतमध्ये पायऱ्यांवरच भाजपने प्रति विधानसभा भरवलीय.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाने भरवली प्रतिविधानसभा | भास्कर जाधव म्हणाले, त्यांचा स्पीकर जप्त करा!
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडलाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. मात्र या प्रतिविधानसभेविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी कारवाईची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजपनेच खोटी स्टोरी रचली होती? | अधिवेशनापूर्वीची जाधवांची ती वक्तव्य जिव्हारी?
अधिवेशनाचा पहिला दिवस राहिला तो खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नावावर. ओव्हर कॉन्फिडन्ट भाजपला महाविकास आघाडीने असं काही कोंडित पकडलं की भाजप बॅकफूटवर गेलं. अधिवेशन सुरु होण्याच्या अगोदर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी, अशा विषयांवरुन विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांची अशी कोंडी करणार की सरकारला प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ येणार असं चित्र होतं. भाजपनेही पहिल्या अर्ध्या तासात आक्रमक होत याचे संकेत दिले. मात्र तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव विराजमान झाले आणि चित्रच पालटलं.
4 वर्षांपूर्वी -
Monsoon session | २ दिवसीय पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार | काय असतील महत्वाचे मुद्दे?
सोमवारपासून सुुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव मांडण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला अाहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यामध्ये वादळी चर्चा होऊन केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात ठराव मंजूर करण्याचा निर्णय झाला. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. परिणामी, नाराज मुख्यमंत्र्यांनी प्रथेप्रमाणे प्रसारमाध्यमांना सामोरे न जाता निघून जाणे पसंत केले.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती रोखल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवड पावसाळी अधिवेशनातही टळणार? | आघाडीचे प्रत्युत्तर
मागील चार महिने रखडलेली विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष यांच्या दबावाला सरकार भीक घालत नसल्याचे दाखवण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय आघाडीच्या समन्वय समितीत झाला असल्याचे वृत्त आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जशी विधान परिषदेच्या १२ सदस्यांची शिफारस प्रलंबित ठेवली आहे, तसे आम्हीसुद्धा विधानसभा अध्यक्षपद प्रलंबित ठेवू शकतो, हे आघाडीला दाखवायचे आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र स्वतःकडे घेण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल? - सविस्तर वृत्त
राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईचे फास आवळले जात असताना, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील ईडीची ‘फाइल’ तयार होत आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट देणारे तत्कालीन पोलिस महासंचालक परमबीरसिंग हे वाझे-देशमुख प्रकरणानंतर भाजपसोबत गेल्याने, महाविकास आघाडी सरकारविरोधातील घडामोडींना आणखी वेग आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधान परिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्रात अनेक मुद्द्यांपैकी एक महत्वाचा विषय म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा. गेले अनेक महिने नावांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे देऊनही त्यावर शिक्कामोर्तब झाला नाही. यावरुन आता सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप केला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने यासंदर्भातील याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. राज्यपालांना सल्ला देणे हे आमचे काम नाही, असे कोर्टाने याचिकादाराला सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस शिपाई आता निवृत्तीच्या वेळी PSI होणार | गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील पोलिस शिपाई आणि कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने सुखद घोषणा करण्यात आली आहे. आता राज्यभरातील पोलिस शिपाई आपल्या निवृत्तीपर्यंत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंत मजल मारतील. पोलिस दलात शिपाई या पदावर रुजू होणाऱ्या प्रत्येकाची आता पोलिस उप-निरीक्षक पदावर निवृत्ती होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात यासंदर्भातील घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-शहा, फडणवीस भेटीचा राज्य सरकार पाडण्याशी संबंध नाही | आम्ही 2024'च्या तयारीला लागलोय - रावसाहेब दानवे
देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राला काय करायचं ते करू द्या | शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री
शेतकरी विरोधी कोणतीही भूमिका घेऊन केंद्र सरकारने मंजूर केलेले बिल हे महाराष्ट्रात मंजूर केले जाणार नाही, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (गुरुवारी) सय्यद पिंपरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी त्यांनी केंद्रीय कृषी कायद्याबाबत आपले मत व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
विधानसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? | संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर
नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, आमदार संग्राम थोपटे, के. सी. पडवी यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत. दिल्लीमध्ये संग्राम थोपटे आणि के सी पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे थोपटे राजकीय विरोधक मानले जातात. तर शिवसेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह असल्याचे समजते. त्यामुळे विधानसभेचा अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुपचा हा शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी 38,226% परतावा दिला, फायदा घ्या - NSE: ADANIENT
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK