महत्वाच्या बातम्या
-
बॅलेट पेपरने निवडणुकीचा निकाल काय लागतो ते दिसलं | काश EVM होता तो
राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे. पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपुर पदवीधर या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचा विजय झालेला पाहायला मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपणच विजयी होणार असा केलेला दावा फोल ठरलेला दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस, चंद्रकांत दादांच्या नैत्रुत्वात भाजपचा दारुण पराभव | धुळे-नंदुरबार उमेदवाराच्या पुण्याईवर
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसलाय. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय.
4 वर्षांपूर्वी -
ST महामंडळाला १ हजार कोटींचे अर्थसहाय्य | महाविकास आघाडी सरकारचा निर्णय
मागील काही महिन्यांपासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन देणे देखील राज्यसरकारला कठीण झाले होते. त्यात वेतन मिळत नसल्याने घर प्रपंच चालवणे कठीण झाल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुःखद घटना देखील घडल्या होत्या. मात्र कर्मचाऱ्यांनी इतकं पाऊल उचलू नये अशी राज्य सरकारने देखील विनंती केली होती आणि सरकारच्या वतीने योग्य पाऊल उचलण्याची हमी दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
KDMC निवडणूक | राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनीच केली निवडणूक एकत्र लढविण्याची घोषणा
कोरोनाने पुन्हा जोर धरलेला असताना राज्यात महत्वाच्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यातील एक महत्वाची महानगरपालिका म्हणजे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका म्हणावी लागेल. राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ऑपरेशन कमळ राज्यात शक्य नाही | आमदार फुटलाच तर त्याचं डिपॉजिट जप्त
महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून लवकरच महाविकास आघाडी सरकार पडणार असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार करत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष कधी पूर्ण केलं ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देखील समजलं नसावं. त्यामुळे महाविकास आघाडीचे मंत्री वारंवार भाजपच्या ऑपरेशन लोटसची खिल्ली उडवत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गेंड्याचं कातडं पांघरलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग यायला तयार नाही
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राऊत यांच्यावर जोरदार शब्दांत प्रहार केला आहे.करोना संकटाच्या काळात शेतकरी आणि कामगारांचे कंबरडेच मोडले. गेले काही महिने अभूतपूर्व अशा आर्थिक संकटातून जात असलेल्या या वर्गाला १०० टक्के वीजबिलमाफी देऊन खरंतर आधार देण्याची गरज होती मात्र गेंड्याचं कातडं पांघरलेल्या राज्यातील महाविकास सरकारला जाग यायला तयार नाही, असे नमूद करत विरोधात असताना वीजबिल माफ करा, असे म्हणत शेतकरी व कामगारांबाबत कळवळा दाखवत होता मग आता सत्तेत आल्यावर काय झाले?, असा सवालच खोत यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारकडून ग्राहकांना शॉक | कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही
राज्यातील तमाम ग्राहकांना भरमसाट वीज बिलावरून मोठा शॉक लागला आहे. कारण अनेक आंदोलनं होऊन देखील महाविकास आघाडी सरकारने सामान्य ग्राहकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत वीजबिल भरा असंच म्हटलं आहे. कारण ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीच याबाबत माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्यापासून खुली होणार | राज्य सरकारचा निर्णय
राज्यातील धार्मिक स्थळांचे दरवाजे अखेर खुले होणार आहेत. पाडव्यापासून म्हणजेच सोमवार दि. १६ नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी यांनी तुरुंगात वापरला मोबाईल | दोन पोलीस निलंबित
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी अंतरीम जामिनासाठी मंगळवारी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेवर आज म्हणजे बुधवारी सुनावणी पार पडत असून न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरु झाला आहे. जस्टीस धनंजय चंद्रचूड आणि जस्टीस. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठात अर्णव गोस्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी सध्या सुरु आहे. मुंबई हायकोर्टाने सोमवारी याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता आणि कनिष्ठ कोर्टात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अर्णव यांनी अधिवक्ता निर्निमेष दुबे यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडून २२९७ कोटी वितरित करण्याचा आदेश | शेतकऱ्यांना दिलासा
महाविकास आघाडी सरकारच्या आर्थिक मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अखेर सुखद बातमी मिळाली आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी एकूण २२९७ कोटी ६ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे अधिकृत आदेश आज राज्य शासनाकडून काढण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून एकूण १०,००० कोटींची नुकसानभरपाई देण्यासाठी पॅकेज जाहीर केले होते.
4 वर्षांपूर्वी -
ST कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २ महिन्यांचं वेतन देणार | टोकाचं पाऊल उचलू नका - राज्य सरकार
दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं जळगावात एका एस.टी कर्मचाऱ्यानं (ST Mahamandal Employee) गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तत्पूर्वी माझ्या आत्महत्येला ST महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकलं. जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरने (ST Mahamandal Counductor Manoj Anil Chaudhari) सोमवारी (९ नोव्हेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चौधरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत
महाविकास आघाडी सरकार पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यात कर्तव्यावर असताना कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदत देण्यात आली. कोरोना आपत्तीच्या संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या काही पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अशा खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदतीचे धनादेश राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाकडून विधिमंडळ सचिवांना कारणे दाखवा नोटीस | २ आठवड्यांचा कालावधी
Republic TV’चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने विधिमंडळ सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला सविस्तर उत्तर देण्यासाठी कोर्टाने २ आठवड्यांचा कालावधी विधिमंडळ सचिवांना दिला आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक केली जाऊ शकत नाही, असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिवाळीनंतर १० वी -१२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळा ? | शिक्षण मंत्री म्हणाल्या
अनलॉक ५ ची अंमलबजावणी राज्य सरकारकडून वेगाने सुरु असून येत्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होण्याचे संकेत याआधीच मिळाले आहेत. कालच सिनेमा थिएटर्स तसेच मनोरंजन क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पुढची महत्वाची आखणी सुरु झाली आहे आणि ती म्हणजे राज्यातील शाळा सुरु करणे.
4 वर्षांपूर्वी -
दिवाळी आधी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार | वडेट्टीवार यांची माहिती
राज्यातील परतीच्या पावसानं मोठा धुमाकूळ घातला होता. अनेक ग्रामीण भागात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारनं केली होती. अखेर त्यासंदर्भात निर्णय झाला असून, दिवाळी आधी महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद | यादी बाजूला करण्याचं त्यांचं आधीच ठरलंय | मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट
विधानपरिषदेसाठी कोणत्या पक्षाकडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आज विधानपरिषदेसाठी १२ जागांसाठी उमेदवारांच्या नावांची शिफारस ठाकरे सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याचं वृत्त आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अधिकृत यादी सुपूर्द करणार आहेत. त्यामुळे संबंधित यादीत कोणाची नावं असणार आहेत याची चिंता तीनही पक्षातील नेते मंडळींना आहे. विशेष म्हणजे त्यानंतर पुन्हा राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद निर्माण होणार नाही ना हे देखील पाहावं लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
वेळप्रसंगी कर्ज काढू | पण शेतकऱ्यांना मदत करू | विजय वडेट्टीवार यांचं आश्वासन
अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली त्याचेही पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून यासाठी वेळप्रसंगी ड्रोनचाही वापर करण्यास सांगितले आहे. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू असे आश्वासक उद्गार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले.अतिवृष्टीमुळे कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने त्यांनी आज नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला.
4 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडीचे कारभारी अपयशी | म्हणूनच पवारांना या वयात बांधावर जाण्याची वेळ
अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहेत. त्यामुळे भरीव मदतीसाठी केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहीजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसंच आपण मदतीसाठी केंद्र सरकारकडे मदत मागणार असल्याचेही पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शरद पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना पवार यांनी ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार बरखास्त करा | याचिका फेटाळत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना झापले
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात होती. तशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती याचिका आज (१६ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार हटवावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावेळी सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांला चांगलेच फटकारले. तुम्हाला महाराष्ट्र किती मोठे राज्य आहे, हे माहित आहे का, असे विचारत सरन्यायाधीश बोबडे यांनी याचिका कर्त्यांना सुनावले आहे. दिल्लीतील ३ जणांनी ही याचिका दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस मारहाण प्रकरण | ठाकरे सरकरमधील मंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा
महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने पोलीस मारहाण प्रकरणात ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजारांचा दंड ठोठावला आहे. आठ वर्षे जुन्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ वर्षांपूर्वी यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम