महत्वाच्या बातम्या
-
वीज पुरवठा खंडित करून घातपात घडवायचा होता? | ऊर्जामंत्र्यांचं ट्विट
महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित होण्यामागे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्यांची लूट आणि राज्यातील मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही | मनसेकडून संताप
लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांची जिथे हजारो रुपयांच्या वीजबिलामुळे दमछाक होत होती, तेथे राज्यातील 15 मंत्र्यांना गेल्या 4 ते 5 महिन्यांची वीजबिलं दिली गेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्यांची लूट आणि मंत्र्यांशी सेटलमेंट? राज्यातील १५ मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही
लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांची जिथे हजारो रुपयांच्या वीजबिलामुळे दमछाक होत होती, तेथे राज्यातील 15 मंत्र्यांना गेल्या 4 ते 5 महिन्यांची वीजबिलं दिली गेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी नाही | उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
नव्या कृषी विधेयकावरुन आज शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास फोडाफोडी | नागपुरात अस्तित्व निर्माणासाठी शिवसेनेकडून मित्रपक्ष काँग्रेसला सुरुंग
काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकमेकांचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडाफोडीवरून मोठं वादळ निर्माण झालं होतं. कारण सत्तेत एकत्र असूनदेखील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
5 वर्षांपूर्वी -
मराठा उमेदवारांना EWS चे लाभ | आंदोलकांवरील गुन्हे मागे | ठाकरे सरकारचे ८ मोठे निर्णय
आरक्षणाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात सुटेपर्यंत ठाकरे सरकारने मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा देण्यासाठी 8 मोठे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर सुनावणी होऊन आरक्षणावरील स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार आक्रमक | विशेषाधिकार उल्लंघन प्रकरणी अर्णब गोस्वामीला ६० पाणी पत्रं
रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला होता आणि त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी | एकूण ७४ पॅकेज
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या योजनेबद्दल माहिती दिली आहे. या योजनेसाठी १२५ कोटी रुपये लागणार आहेत. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात तातडीने उपचार व्हावेत यासाठी ही योजना असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
एक महाराष्ट्र एक मेरिट पद्धत लागू | वैद्यकीय प्रवेशात ७०-३० कोटा रद्द
वैद्यकीय प्रवेशात ७०-३० कोटा आज रद्द करण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. २०१५ पासून हा कोटा रद्द करण्याची मागणी होत होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली आहे. ७०-३० कोटा पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहतात, त्यामुळे राज्य सरकारने ही पद्धत रद्द केल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी आक्रमक | विधिमंडळात अर्णब गोस्वामी विरोधात हक्कभंग प्रस्ताव
रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला असून त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ई-पास सुरु राहणार की बंद करणार | राज्य सरकारची भूमिका स्पष्ट
राज्यात करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत ई-पास बंद केला तर करोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही काळ तरी ई-पास सुरू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्या तरी ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ते नागपुरात बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
मनसेने अवाजवी वीज बिलं माफ करण्याची मागणी केंद्राकडे करावी - ऊर्जामंत्री नितीन राऊत
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळानंतर महावितरण आणि इतरही काही वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाट वीज बिलं देण्यात आली. यासंदर्भात सध्या बरीच नाराजी दिसून येत आहे. पण, वीज बिलांची तपासणी केल्यास मुळात वीज बिलांच्या देय रकमेचा आकडा वाढवलेला नाही, असं मत खुद्द राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका - राम शिंदे
राज्यातील महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आहेत, अशी बोचरी टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली. ते शनिवारी सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी बोलत होते. यावेळी राम शिंदे यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही, असे राम शिंदे यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारने २ महिने पगारच दिला नाही, उपासमारीला कंटाळून ST कर्मचाऱ्याची आत्महत्या
कोरोनाच्या काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली असल्याचे बातमी समोर आली होती. मात्र, यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खुलासा केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
वेळ निघून गेली आहे, तेव्हा त्या हाताला प्रेमानं थोपटण्याऐवजी झिडकारण्याचा प्रयत्न झाला - सुभाष देसाई
आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल. कोरोनाचं एका बाजूला व्यवस्थापन करावं लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. सगळ्या बाजारपेठा खुल्या करा अशी मागणी व्यापारी करत आहेत, त्यांची ही मागणी चुकीची नाही. कोरोनाचं संकट गंभीर मात्र उद्योग सुरु करावे लागतील, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकोपा नसल्याने हे महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही - राज ठाकरे
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे?
5 वर्षांपूर्वी -
किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या म्हणत तेच शिवसेनेत प्रवेश करतील
काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, शिवसेनेला पुन्हा मैत्रीची हाक देत, “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही”, असे वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळीचे वातावरण निर्माण झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
होय, महाविकास आघाडीतील काही नेते अस्वस्थ आहेत, पवारांच्या विधानाने खळबळ
शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राज्याच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार आहे, पण निवडणुका वेगळ्या लढू अशी भूमिका भाजपकडून जाहीर करण्यात आली, मात्र या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचं चिन्हं दिसत आहेत. सरकार महाविकास आघाडीचं असलं तरी स्टेअरिंग माझ्या हातात आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी स्टेअरिंग पकडलेला फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, आता खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘महाविकास आघाडी सरकारचा रिमोट माझ्याकडे नाही, काही नेते अस्वस्थ आहे’ असं म्हणून गुगली टाकली आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
एक ट्विट आणि दादा सुपरहिट! गाडीचं स्टिअरिंग स्वतःकडे ठेवत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक फोटो ट्वीट करून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात फक्त करून बघा...उद्धव ठाकरेंचा इशारा
शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे. तसंच सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरीही स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं म्हणत मित्रपक्षांना सूचक इशाराही दिला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB