महत्वाच्या बातम्या
-
भाजप जिंकलं तिथेच सर्वाधिक गोंधळ | जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव - ममता बॅनर्जी
त्या संदर्भात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाही. जिथे भारतीय जनता पक्ष जिंकलं आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ माजलेला आहे. भारतीय जनता पक्ष जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यांनी असे प्रकार थांबवावेत. तुम्ही सर्वांनी निवडणुकीच्या दरम्यान बरंच काही केलं आहे. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे”.
4 वर्षांपूर्वी -
ममता बॅनर्जीं यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
पश्चिम बंगालमध्ये प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी(आज)सकाळी 10:50 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी एक चकीत करणारी घटना घडली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी यावेळी ममता बॅनर्जींना राज्यातील हिंसा बंद झाल्या पाहिजे, अशा सूचना दिल्या.
4 वर्षांपूर्वी -
भाजप खासदाराची TMC नेते आणि मुख्यमंत्र्यांना धमकी, म्हणाला लक्षात ठेवा...
राज्यात विधानसभेची निवडणूक संपताच राजकीय हिंसाचाराची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, निकालाच्या दिवशीच कोलकातामधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली होती. तर सोमवारी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण करत हत्या केल्याची बातमी समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे खासदार परवेश साहिब यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते धमकी देत म्हणाले की, लक्षात ठेवा टीएमसीच्या नेत्यांना आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनादेखील दिल्लीत यावे लागते.
4 वर्षांपूर्वी -
नंदिग्राममध्ये पुन्हा मतमोजणी झाल्यास आपल्या जीवाला धोका असल्याचं तिथल्या रिटर्निंग ऑफिसनं भीती व्यक्त केली होती - ममता बॅनर्जी
रविवारी ५ राज्यांचे निकाल जाहीर झाले, परंतु संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, तर राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ७६ जागांवर समाधान मानावे लागले. परंतु, आता ममता बॅनर्जी यांनी देशभरातील भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा चंग बांधल्याचं दिसतंय.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाशी लढाई ही आत्ताची प्राथमिकता | त्यानंतर सर्व भाजप विरोधकांना २०२४ साठी एकत्र आणणार - ममता बॅनर्जी
रविवारी ५ राज्यांचे निकाल जाहीर झाले, परंतु संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, तर राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला ७६ जागांवर समाधान मानावे लागले. परंतु, आता ममता बॅनर्जी यांनी देशभरातील भाजप विरोधकांना एकत्र आणण्याचा चंग बांधल्याचं दिसतंय.
4 वर्षांपूर्वी -
निवडणूक आयोग भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं | अन्यथा भाजपला ५० जागाही मिळाल्या नसत्या - ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. रविवारी ५ राज्यांचे निकाल जाहीर झाले, परंतु संपूर्ण देशाचे लक्ष फक्त पश्चिम बंगालमधील चुरशीच्या लढाईवर होते. अपेक्षेप्रमाणे बंगालमध्ये निकालामध्येही ‘खेला’ झाला. राज्याच्या एकूण २९२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवून २१४ जागा जिंकल्या, तर राज्यात पहिले भगवे सरकार स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या भाजपला ७६ जागांवर समाधान मानावे लागले.
4 वर्षांपूर्वी -
नंदीग्राममधून शुभेंदु अधिकारी विजयी | पक्षासाठी फिरताना स्वतःच्या मतदारसंघांसाठी वेळ अपुरा पडला
संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपचे आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपकडून बंगालमध्ये पद्धतशीरपणे ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल विधानसभा निकाल | सकाळचा भाजप समर्थकांचा 200 पार ट्विटर ट्रेंड काही वेळातच मावळला
कोरोनाच्या विक्रमी प्रकरणांदरम्यान 62 दिवस सुरू चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर अखेर आज पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 5 राज्यांपैकी सर्वात जास्त उत्सुकता ही बंगालची आहे. कारण यावेळी ममता बॅनर्जींच्या तृणमूलला काँग्रेसला लेफ्ट आणि काँग्रेसकडून नाही तर भाजपकडून थेट टक्कर मिळाली आहे. जास्तीत जास्त एग्जिट पोल्समध्ये हेच दाखवले आहे की, भाजप यावेळी ममतांना बरोबरीने टक्कर देणार आहे. दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये बंगालमध्ये तृणमूलला मोठे नुकसान होत असताना दिसत आहे. भाजप तृणमूलला कठोर टक्कर देत आहे. तर महत्त्वाचे म्हणजे नंदीग्राम जागेवर ममता बॅनर्जी भाजपच्या शुभेंदु अधिकारींपेक्षा पिछाडीवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तामिळनाडूत एनडीए पराभवाच्या छायेत, प. बंगालमध्ये पुन्हा ममता 'राज' तर केरळात डावे सत्तेच्या दिशेने
कोरोनाच्या विक्रमी प्रकरणांदरम्यान 62 दिवस सुरू चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर अखेर आज पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 5 राज्यांपैकी सर्वात जास्त उत्सुकता ही बंगालची आहे. कारण यावेळी ममता बॅनर्जींच्या तृणमूलला काँग्रेसला लेफ्ट आणि काँग्रेसकडून नाही तर भाजपकडून थेट टक्कर मिळाली आहे. जास्तीत जास्त एग्जिट पोल्समध्ये हेच दाखवले आहे की, भाजप यावेळी ममतांना बरोबरीने टक्कर देणार आहे. दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये बंगालमध्ये तृणमूलला मोठे नुकसान होत असताना दिसत आहे. भाजप तृणमूलला कठोर टक्कर देत आहे. तर महत्त्वाचे म्हणजे नंदीग्राम जागेवर ममता बॅनर्जी भाजपच्या शुभेंदु अधिकारींपेक्षा पिछाडीवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी ममतांच देशातील प्रमुख नेत्यांना पत्र
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रातून विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी सुचवलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नंदीग्राम हल्ला | ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर | TMC निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी आता तृणमूल काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने या हल्ल्याची दखल घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांच्याकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
West Bengal Election | टीएमसी'ने जाहीर केली सर्व 291 उमेदवारांची यादी
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच तृणमूल सुप्रिमो आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 294 पैकी 291 जागांवरील उमदेवारांची नावे घोषित केली आहे. ममता बॅनर्जी यांनी तिकीट वाटप जाहीर करताना त्यांनी स्वत:चा मतदारसंघ बदलला असून त्या नंदिग्राममधून निवडणूक लढणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारण्यासाठीच नंदिग्रामची निवड केल्याचं बोललं जात आहे. नंदीग्राम ममता बॅनर्जींचे जवळचे आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले शुभेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी क्रिकेटर मनोज तिवारी आणि अभिनेत्री सयानी घोषचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय मैदानात चेहऱ्यावर बोली लावली जात आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू मनोज तिवारी यांनीही आता राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल निवडणुकीपूर्वी CBI कामाला लागली | घोटाळा प्रकरणी TMC नेत्यांच्या घरी छापेमारी
पश्चिम बंगालमध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेंट्रल इंवेस्टिगेशन ब्यूरो (CBI) अॅक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी CBI ने कोळसा घोटाळा प्रकरणात बंगालच्या पुरुलिया, बांकुरा, बर्दवान आणि कोलकातामध्ये 13 ठिकाणांवर छापेमारी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही छापेमारी युवा तृणमूल काँग्रेस नेते विनय मिश्रा, व्यवसायी अमित सिंह आणि नीरज सिंहच्या ठिकाणांवर झाली.
4 वर्षांपूर्वी -
...तुमचा मुलगा जय शाहचं काय? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले? | ममता बॅनर्जींचा सवाल
मोदी सरकारने कोरोना लसीकरणानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याची घोषणा केलीय. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिलीय. ते पश्चिम बंगालमधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यानंतर मोदी सरकार पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हिंदू निर्वासितांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी ही घोषणा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमित शहांकडे ५१ लाख व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत | त्यांनी माध्यमंही विकत घेतली आहेत - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भारतीय जनता पक्षाने देखील त्याच अनुषंगाने मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यानिमित्ताने अमित शाह आणि जे पी नड्डा यांनी देखील दौरे केल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
२९४ जागा लांबच | भाजपने प. बंगालमध्ये केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात
सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) एकमेकांविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या रणधुमाळीत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे निवडणुकीचे बिगूल वाजवले असून, भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
4 वर्षांपूर्वी -
बंगालचे रुपांतर गुजरातमध्ये केले जाऊ शकणार नाही | बंगालनेच देशाला राष्ट्रगीत दिलं
तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये मागील महिन्यांपासून घमासान सुरू आहे. गेल्या काही दिवसांत हे राजकीय वैर आणखी तीव्र होत असल्याचं दिसून आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला होता. अखेर ममता बॅनर्जी यांनीही भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देत पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल | आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडे उमेदवाराचं नसल्याने तृणमूलची फोडाफोडी
पुढील वर्षी म्हणजे एप्रिल-मे 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याआधीच आतापासूनच फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील एकूण 294 पैकी तब्बल 200 जागा जिंकण्याचा निर्धार अमित शाहांनी केला आहे. एकीकडे बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर, त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने शेजारील पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस 219 जागांसह सत्तेत आहे. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 इतका आहे. 2021 मध्ये इथे निवडणुका होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या ताफ्यात एवढ्या मीडियाच्या गाड्या का होत्या | ते सर्व नियोजित होतं का? - ममता बॅनर्जी
गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना पश्चिम बंगालच्यामुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नड्डांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात असतानाच ममता यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे आणि कार्यकर्त्यांकडे काही काम नसल्याचा टोला लगावला आहे. “त्यांना दुसरी काही कामं नाहीयत. कधी इथे केंद्रीय गृहमंत्री येतात तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा. जेव्हा त्यांच्याकडे कोणी प्रेक्षक नसतात तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांना नौटंकी करण्यासाठी बोलवतात,” असं देखील ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL