महत्वाच्या बातम्या
-
प. बंगाल | भाजपा सत्तेत आली तर पोलिसांना बूट चाटायला लावू - राजू बॅनर्जी
भारतीय जनता पक्षाचे नेते राजू बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर टीका करताना बंगाल पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधानं केलं आहे. “राज्यातील पोलीस आम्हाला मदत करत नाही. जर भाजपा सत्तेत आली तर पोलिसांना बूट चाटायला लावू” असं विधान त्यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सर्व राज्यांमध्ये गुजरातनेच सत्ता का करावी? फोडाफोडीच्या राजकारणावरून ममतादीदींचा प्रश्न
सध्या भाजपच्या राजस्थानमधील राजकीय खेळीची चर्चा संपूर्ण देशात रंगली आहे. भाजपमधील केंद्रीय पातळीवरील आणि राज्य पातळीवरील नेते मंडळी यामध्ये प्रतिक्रिया देत असले तरी, त्या चर्चेपासून मोदी-शहांनी स्वतःला दूर ठेवलं आहे. जणू राजस्थानात जे घडत आहे त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नसून, जे घडतंय त्यात राजस्थानमधील काँग्रेसमधील अस्वस्थ असलेली नेते मंडळी कारणीभूत आहेत असं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ममता बॅनर्जी आणि मोदी यांच्यात CAA, NRC आणि NPR वर चर्चा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. नागरिकत्व सुधारणआ कायदा (सीएए) आणि एनआरसी संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यात सीएए आणि एनआरसीला आमचा विरोध असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे स्पष्ट केले. दिल्ली आणि कोलकाता दोन्ही शहरांमध्ये या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना, ही भेट झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताचे पंतप्रधान की पाकिस्तानचे राजदूत आहात; ममतांचा मोदींना सवाल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. तुम्ही पाकिस्तानसोबत नेहमी भारताची तुलना करता, भारताचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे ब्रॅण्ड अँबॅसिडर आहात, असा सवाल त्यांनी पंतप्रधान मोदींना केला.
5 वर्षांपूर्वी -
CAB २०१९ आणि NRC विरोधात ममता बॅनर्जी आंदोलनासाठी रस्त्यावर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व कायदा आणि एनआरसी राज्यात लागू होऊ देणार नाही, असं सांगत त्याविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली मार्च निघाला असून, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'एक देश एक भाषा' धोरणाचं शहांनी समर्थन करताच देशभरातून टीकास्त्र
हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा असली पाहिजे असं स्वातंत्र्यसैनिकांना वाटत होतं. त्यामुळे हिंदी भाषा ही आपल्या राष्ट्राची भाषा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. “आपल्या देशात अनेक भाषा बोलल्या जातात, अनेक भाषा एका देशात बोलल्या जाणं याकडे काही लोक एखादं ओझं म्हणून पाहतात. मात्र एका देशात अनेक भाषा बोललं जाणं ही एक सुंदर बाब आहे. असं असलं तरीही देशाची अशी एक भाषा असणं खूप आवश्यक आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी गाजावाजा; मोदी सत्तेत येण्यापूर्वी इस्रोच्या मोहीम झाल्या नाहीत का?
चा विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटल्यानं चांद्रयान मोहिमेला धक्का बसला. जवळपास संपूर्ण मोहीम अगदी सुरळीत सुरू असताना अखेरच्या दोन मिनिटांमध्ये इस्रोच्या हाती निराशा आली. यानंतर भावूक झालेल्या इस्रो प्रमुख के. सिवन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धीर दिला.
5 वर्षांपूर्वी -
तृणमूलच्या मेकओव्हरची तयारी सुरु; प्रशांत किशोर तयार करणार ‘ब्रँड ममता’
२०१२ मध्ये पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि ममतादीदी गेले काही वर्षे देशातील राजकारणात मागे पडल्याचे चित्र आहे. तृणमूलमधील अनेक खासदार आणि आमदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल पक्षाचा ‘मेकओव्हर’ करण्यासाठी आणि ब्रँड ममता तयार करण्यासाठी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर याची मदत घेतली जाणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशात मागील ५ वर्षापासून 'सूपर इमर्जन्सी': ममता बॅनर्जी
भारतात ४४ वर्षापूर्वी म्हणजे २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आजच्या या आणीबाणी घटनेला प्रत्येक जण आपल्यापरिने ट्विट करत भाष्य करत आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीच्या या घटनेवर ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून ममता यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएमला विरोध करत बॅलेट पेपरने निवडणुका घेण्यासाठी तृणमूलच्या खासदारांची निदर्शनं
काल बसपाच्या सर्वेसेवा मायावती यांनी इव्हीएमवर संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, यावेळी मायावतींनी लोकसभा निवडणुकीतील अनेक गैरप्रकारांवर प्रकाश टाकला होता. तसेच जगातील प्रगत देश देखील बॅलेट पेपरने निवडणुका घेत असताना आणि भारतात सर्वच विरोधी पक्षांचा इव्हीएमला विरोध असताना केवळ भाजप आणि निवडणूक आयोगच त्याच समर्थन करत आहे, असं मायावतींनी अधोरेखित करत वेगळाच संशय व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगालमधील आरोग्य सेवा कोलमडली, तब्बल ७०० डॉक्टरांचे राजीनामे
कोलकाता शहरातील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील २ डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. सदर घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह देशभरातील निवासी डॉक्टर काल शुक्रवारपासून संपावर होते. डॉक्टरला मारहाण केल्यानंतर सुरू झालेल्या डॉक्टरांचे कामबंद आंदोलन आता देशभर पसरले असून, महाराष्ट्र, बिहार, नवी दिल्ली, गोवा, झारखंडसह अनेक राज्यांतील डॉक्टर त्यात मोठ्याप्रमाणावर सहभागी झाले आहेत. आंदोलनाचा भाग म्हणून देशभरातील डॉक्टर सोमवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. आंदोलनामुळे देशातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ७०० डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
प. बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली आलीच पाहिजे; ममता बॅनर्जींचा 'राज'बाणा
डॉक्टरांच्या संपामुळे घेरल्या गेलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढविताना बंगाली भाषा आणि बंगाली अस्मिता कार्ड उघडले आहे. बाहेरच्या लोकांवरून भारतीय जनता पक्षावर नेम धरत, त्यांनी जर आमच्या राज्यात राहायचे असेल तर आमची बंगाली भाषा बोलता आलीच पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. तसेच अशा गुन्हेगारांना राज्यात जरा देखील थारा देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईकवर फिरतात, असे देखील ममता म्हणाल्या.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगालमध्ये राजकीय धुसपूस शिगेला, गावठी बॉम्बचे हल्ले सुरु
पश्चिम बंगालमधल्या कांकीनारा भागात गावठी बॉम्बच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद मुख्तार (६८) ही व्यक्ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. स्थानिक वर्मनपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ परगणा जिल्ह्यातील काकीनारा भागात बरुईपाला येथे मृत मोहम्मद मुख्यार आणि त्याचा परिवार, तसेच शेजारी घराबाहेर बसले होते. त्याचदरम्यान कोणी तरी बॉम्ब फेकला.
6 वर्षांपूर्वी -
ममता बॅनर्जी ईव्हीएम विरोधात आंदोलन पुकारणार; इतर विरोधी पक्षांनाही आवाहन
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान त्यांनी ईव्हीएम विरोधात तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच मतदान बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेतलं जावं याची मागणी लावून धरण्याचं आवाहन ममता यांनी देशभरातील इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा एकूण १८ जागांवर विजय
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत केवळ २ जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाने यावेळी मात्र तब्बल १८ जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना जोरदार राजकीय धक्का दिला आहे. दरम्यान, सर्व जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा करणाऱ्या तृणमूल काँग्रेसला केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर काँग्रेसच्या पारड्यात केवळ १ जागा आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या रणनीतीचा हा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे. मागील २ वर्षांपासूनच अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे प्रयत्न सुरू केले होते. तसेच भाजपा शाह यांच्या मिशन-२३ च्या जवळ पोहोचली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ वगळता यापूर्वी एक्झिट पोल खोटी ठरली व भलतेच निकाल आल्याचा इतिहास
काल लोकसभा निवडणुकीच्या ७व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपताच अनेक टीव्ही वृत्तवाहिन्यांची विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलची निरीक्षणं प्रसिद्ध केली आहेत. वास्तविक २३ तारखेला खरं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये एक्झिट पोलची दिली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळंही असू शकतं असा पूर्व इतिहास देखील आहे. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ मधील एक्झिट पोलची आकडेवारी त्याच उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्याव्येतिरिक्त ही अनेकदा निरनिराळ्या एजन्सीने केलेली एक्झिट पोल खोटी ठरली असल्याचे इतिहास आहे.
6 वर्षांपूर्वी -
EVM मध्ये फेरफार करण्यासाठी Exit Polls चा होतोय वापर: ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एक्झिट पोलवरुन ईव्हिएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून मोठी शंका उपस्थित केली आहे. ‘एक्झिट पोलवर माझ्या विश्वास नाही, कारण अशा रणनितीचा वापर फक्त ईव्हिएममध्ये घोटाळा करण्यासाठी केला जातो’, असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आजवर मोदी व शहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी केली तर बिघडले कुठे? राज ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. मात्र आजवर या दोघांनी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतरांसोबत दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर त्यात बिघडले कुठे? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून अमित शहा पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
कोलकात्यातील घटनेला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार: संजय राऊत
पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेली परिस्थिती लोकशाहीसाठी दुर्दैव घटना असून कोलकात्यातील या घटनेला पश्चिम बंगालमधील ममता दीदींचे सरकार जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राड्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
जर तिथे सीआरपीएफ नसती तर मला बाहेर निघताच आलं नसतं: अमित शहा
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यासागर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. मंगळवारी झालेल्या शाह यांच्या रोड शो दरम्यानच्या हिंसाचाराची माहिती देण्यासाठी दिल्लीत घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पराभव डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा जळफळाट होत असल्याची टीकाही यावेळी अमित शहा यांनी केली.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL