Manaksia Share Price | गुंतवणूकदार मालामाल! 3 वर्षांत 475 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या शेअरवर 150 टक्के डिव्हीडंड जाहीर
Manaksia Share Price | मॅनाक्सिया या स्मॉल कॅप कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पोस्ट कोविड रिबाउंडमध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. या काळात हा स्टॉक 30.50 रुपयेवरून वाढून 176.50 रुपये किमतीवर पोहचला होता. म्हणजेच मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने 475 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आता या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदाराना 150 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 1,150 कोटी रुपये आहे. ही स्मॉल कॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 3 रुपये अंतिम लाभांश वाटप करणार आहे. लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आज मंगळवार दिनक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.98 टक्के घसरणीसह 177.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी