VIDEO | मणिपूर हिंसाचार! मोदींच्या 'मन की बात' वरून घरातील रेडिओ तोडल्यानंतर आता जनतेकडून भाजपचे झेंडे जाळण्यास सुरुवात
Manipur Women Case | हिंसाचारग्रस्त ईशान्येकडील मणिपूर राज्यातून एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. शेकडो लोकांचा जमाव रस्त्यावर दोन आदिवासी महिलांना नग्न अवस्थेत फिरवल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून देशभरातून लोक संतप्त झाले असून प्रशासनाकडून कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. सर्वत्र नग्न परेड केल्यानंतर शेजारच्या शेतात या दोन महिलांवर जमावाने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका स्थानिक आदिवासी संघटनेने केला आहे. इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने (आयटीएलएफ) दिलेल्या निवेदनानुसार, राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी ही घटना घडली.
2 वर्षांपूर्वी