Manipur Crisis | मणिपूर हिंसाचार, तीन महिने उलटून गेले तरी लोकं अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत, सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं
Manipur Crisis | मणिपूरमधील महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचाराच्या घटनांवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी कठोर भूमिका घेतली आहे. हिंसाचाराच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली समिती स्थापन करण्याबाबतही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, या प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआय आणि एसआयटीवर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. लोकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावे लागतील. आधीच बराच वेळ निघून गेला आहे. तीन महिने उलटून गेले तरी लोक अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही.
1 वर्षांपूर्वी