Manufacturing Index Fund | भारतातील पहिला मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स म्युच्युअल फंड सुरू, गुंतवणुकीची सुवर्ण संधी
नवी म्युच्युअल फंडाने नवी निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स फंड आज म्हणजेच १२ ऑगस्ट रोजी बाजारात आणला आहे. नवी म्युच्युअल फंडातर्फे यंदा सुरू करण्यात येणारा हा सहावा फंड आहे. उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारा हा भारताचा पहिला इंडेक्स फंड आहे. हा एक ओपन एंडेड इंडेक्स फंड आहे जो निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्सची नक्कल करण्याचा प्रयत्न करेल. निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स भारतातील पहिल्या ३०० कंपन्यांमधील उत्पादकांच्या कामगिरीचा मागोवा घेतो.
2 वर्षांपूर्वी