महत्वाच्या बातम्या
-
आज मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याचे उत्तर आज मिळणार आहे. त्याचबरोबर मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता. परंतु सोबतच याचे भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असेही सांगितले होते. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
जेष्ठ विधितज्ञ पी.एस. नरसिंहा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडणार
जेष्ठ विधितज्ञ पी.एस.नरसिंहा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडणार असल्याची माहिती ऍडव्होकेट विनोद पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या वतीने विनोद पाटील न्यायालयीन लढा लढत आहेत, येत्या ७ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून विनोद पाटील यांनी त्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. पी.एस.नरसिंहा हे देशातील नामांकित विधितज्ञ असून त्यांनी मध्य प्रदेशमध्ये आरक्षणाची केस लढली होती तसेच देशातील बीसीसीआय’सारख्या इतर प्रमुख केसेसमध्ये बाजू मांडलेली आहे. ते देशाचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया होते.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच काही बर वाईट झाल तर सरकार जबाबदार राहील - विनोद पाटील
मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने भक्कम तयारी केल्याचे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा ठाम विश्वास व्यक्त केला होता. मात्र, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
रेट्रॉस्पेक्टीव म्हणजे हा कायदा पूर्वलक्षीप्रभावाने लागू होणार नाही: वकिल गुणरत्न सदावर्ते
मराठा आरक्षणासंदर्भातील सुप्रीम कोर्टाने केलेली सुनावणी हा महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का असल्याचे मराठा आरक्षणाविरोधातील याचिकाकर्ते वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकार आणि प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे. कोर्टाने सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्हाला मोठा दिलासा दिला. हा कायदा रेट्रॉस्पेक्टीव्ह जाणार नाही, आणि पुढील दोन आठवड्यात सुनावणी होईल, असे देखील न्यायालयाकडून सांगण्यात आल्याचे वकील सदावर्ते प्रसार माध्यमांना म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!! : खासदार संभाजीराजे
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली. दरम्यान महाराष्ट्रात सरकारला सदर प्रकरणी पुढील २ आठवड्यात उत्तर देण्याचे थेट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असून मराठा आरक्षणाला तूर्तास तरी स्थगिती देण्यात अली नसल्याने संपूर्ण मराठा समाजाचा आणि महाराष्ट्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
वैद्यकीय शिक्षण: भाजप-सेनेमुळे मराठा विद्यार्थ्यांचं आयुष्य उध्वस्त? आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण नाही
देशातील आरक्षण नसलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारने गेल्या फेब्रुवारीमध्ये निर्णय घेतला होता. यावर महाराष्ट्र सरकारने केलेल्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एकाबाजूला निवडणुकीत मतांसाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचा कांगावा केला आणि नव्या लोकसभेच्या प्रचारापासून या विद्यार्थ्यांकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्यांचे शैक्षणिक आयुष्य पणाला लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; वैद्यकीय शिक्षण प्रवेशाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला ‘एसईबीसी’ प्रवर्गातर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याबाबत काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पदव्युत्तर वैद्यकीयचे आतापर्यंत किती प्रवेश झाले याची सविस्तर आकडेवारीची माहिती सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज गुरुवारी होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
अखेर आज मराठा समाजाच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना
पाडव्याच्या मुहूर्तावर आज ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या नव्या मराठा समाजाच्या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही राजकीय पक्षाची स्थापना करत असल्याचं सुद्धा ते म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव: शरद पवार
मराठा समाजच्या आंदोलकांनी हिंसा तसेच जाळपोळीचे प्रकार थांबवून शांततेने आंदोलन करण्याला प्राधान्य द्यावे आणि मराठा व बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव हाणून पडावा असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
VIDEO; माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत घोषणाबाजी..एक मराठा..लाख मराठा
बारामतीतील `गोविंदबाग`या शरद पवारांच्या बंगल्यासमोर आज मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी ठिय्या धरला. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आंदोलनकर्त्यांमध्ये सामील झाले. त्यांनी थेट ‘एक मराठा…लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र बंद - शरद पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर ठिय्या
महाराष्ट्र बंद – शरद पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर ठिय्या
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, पंढरपुरात इंटरनेट बंद
मराठा आरक्षणासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंद मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना वगळण्यात आलं आहे. परंतु राज्यात इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत पंढपुरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाचा उद्रेक होण्यापूर्वी आरक्षणाबाबत तोडगा काढा: उदयनराजे भोसले
आज मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील शेकडो समन्वयकाच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण परिषद पार पडली.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही
आज मुंबईमध्ये पार पडलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या नियोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने लवकरच मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही हिवाळी अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अॅट्रॉसिटीच्या बाबतीत केंद्राची दिसलेली तत्परता, मराठा आरक्षणासाठी नाही दिसली? उदयनराजे
सरकारकडून वारंवार मराठा आरक्षणासाठी निघणारे मोर्चे थांबले पाहिजे असं आवाहन केलं जात आहे. परंतु सरकारने योग्य वेळीच निर्णय घेतला असता तर मराठा समाजावर ही वेळच नसती आली नसती, असे खासदार उदयनाराजे भोसले म्हणाले. तसेच त्यांनी अॅट्रॉसिटीच्या विषयाला हात घालून केंद्रावर सुद्धा ताशेरे ओढले.
7 वर्षांपूर्वी -
आक्रमक मराठा आंदोलक महिलांनी शिवसेना आमदार मिणचेकरांना बांगड्या दाखवल्या
आक्रमक मराठा आंदोलक महिलांनी शिवसेना आमदार मिणचेकरांना बांगड्या दाखवल्या
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंना फक्त पैशाची टक्केवारी कळते - नारायण राणे
उद्धव ठाकरेंना फक्त पैशाची टक्केवारी कळते – नारायण राणे
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; आज राज्यभर ‘जेलभरो’ आंदोलन
आज सकाळी ११ वाजता मुंबईतील आझाद मैदानातून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने जेलभरो’ आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण - सद्भावना यात्रा २०१६ मेटे व अजित पवार
मराठा आरक्षण – सद्भावना यात्रा २०१६ मेटे व अजित पवार
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावर राजीनामा देणाऱ्या हर्षवर्धन जाधवांना उद्धव ठाकरेंनी भेट का नाकारली?
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पहिला राजीनामा देणारे कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्री भेटीसाठी आले असता त्यांना भेट नाकारली होती. जाधव मुंबईमध्ये आले असता त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वेळ मागितली होती, परंतु उद्धव ठाकरे यांनी जाधवांना भेटण्यास नकार दिला होता. या नकाराचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे वेगळेच राजकीय तर्क लावले जात आहेत.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL