महत्वाच्या बातम्या
-
मराठा आरक्षण - शिवशाही बसला मोर्चेकरांनी दिली वाट
मराठा आरक्षण – शिवशाही बसला मोर्चेकरांनी दिली वाट
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; चाकण'मध्ये अनेक बसेसची जाळपोळ
मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी चाकणमध्ये हिंसक मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. कारण आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी संतप्त होऊन २३-३० बसेस जाळल्या आहेत. त्यामुळे चाकण पोलिसांनी जमावबंदी सुरु केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आज स्वतंत्र बैठक
सध्या मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चातील आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागतच सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. त्या अनुषंगानेच आज शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आपापल्या आमदारांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या स्वतंत्र बैठक आयोजित केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत: फडणवीस
मुंबईमध्ये आज मराठा समाजाच्या काही समन्वयकांशी मुख्यमंत्र्यांशी बैठक पार पडली. त्यावेळी चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ज्या आंदोलकांवर किरकोळ गुन्ह्यांची नोंद झाले ते सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला. परंतु पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चेला जाणाऱ्या प्रतिनिधींचा लातूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत निषेध
आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजाचे काही समन्वयक आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा झाली. परंतु त्या विरुद्ध आज लातूर मध्ये पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत मुंबईमधील बैठकीचा तीव्र निषेध करण्यात आला आणि मुंबईतील ती चर्चा आम्हाला मान्य नाही अस सांगण्यात आलं.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणसाठी आज पुण्यात चक्काजाम
मराठा आरक्षणावरून राज्यभर हिंसाचार सुरु झाल्यावर राज्य सरकार खडबडून जाग झालं असलं तरी मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलन आणि चक्काजाम थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आज मराठा आरक्षणसाठी पुण्यात चक्काजाम करण्यात आल्याने अनेक भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट जाणवत होता.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी 'वारीत साप' सोडण्याचं विधान केल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले
राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच वारीत साप सोडण्याचं विधान केलं आणि त्यामुळेच मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले होते. नाहीतर मराठा आरक्षणच आंदोलन शांततेत चाललेलं, पण सत्ताधाऱ्यांनीच आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि आंदोलन चिघळलं,’ अशा तिखट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
6 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं कधी लोकांना मारत नसतात
छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं कधी लोकांना मारत नसतात.
7 वर्षांपूर्वी
एका मुस्लिम कुटुंबाने मराठा आंदोलना दरम्यान रेल रोको वर आपल्या लहान मुलांना आश्वस्त केले
हीच आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि ती विसरता कामा नये हीच अपेक्षा -
१४ ऑगस्टला मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, पण राज्य मागास आयोगाचा अहवाल?
सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या आक्रमक आंदोलनाने जोर धरला आहे. त्यामुळे सरकार सुद्धा खडबडून जाग झालं आहे आणि सर्व संबंधित विषयांना वेग आल्याचे चित्र आहे. सरकारी पातळीवर या हालचाली सुरु असल्या तरी १४ ऑगस्टला मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. परंतु तत्पूर्वी राज्य मागास आयोगाचा अहवाल येण्यास आणखी ४ महिन्यांच्या कालावधी लागणार समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवल्याचे पत्रकार परिषदेत सांगितलं.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आणि धनगर समाजाची फसवणूक - सुप्रिया सुळे
भाजप सरकारने जाहीरनाम्यात मान्य केलेले मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षण साफ विसरून मराठा आणि धनगर समाजाची साफ फसवणूक करत आहे – सुप्रिया सुळे
7 वर्षांपूर्वी -
सातारा, आंदोलकांनी एनसीपी आमदार शिवेंद्रराजें'ना बोलू दिलं नाही
सातारा येथे मराठा क्रांती मोर्च्यातील आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्र राजे यांना आक्रमक आंदोलकांनी घोषणा देत भाषण करण्यापासून रोखलं असं वृत्त आहे. त्यामुळे साताऱ्यात सुद्धा मराठा आरक्षणावरून वातावरण तापताना दिसत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा क्रांती मोर्चा, औरंगाबादेत आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा मृत्यू
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून औरंगाबादेत पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी काकासाहेब शिंदे या युवकाने नदीत उडी घेऊन निषेध नोंदवताना आपला जीव गमावला होता. काल म्हणजे मंगळवारी जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे वय वर्ष ५५ यांनी आंदोलनादरम्यान विषप्राशन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण, मुंबईत थेट रेलरोको तर ठाण्यात बसेस फोडल्या
औरंगाबाद पासून सुरु झालेल मराठा आरक्षणाचं रुद्र रूप संपूर्ण राज्यभर पसरत आहे. त्यात आज राज्याची राजधानी मुंबई सकट ठाणे, नवी मुंबई आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचे पडसाद सकाळी १० वाजल्यापासून उमटू लागले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
औरंगाबादमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून शासनाच्या वाहनांची तोडफोड
औरंगाबादमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून शासनाच्या वाहनांची तोडफोड
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; उद्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक
मुंबई दादरमधील राजर्षी शाहू सभागृहात मराठा क्रांती मोर्च्याच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली असता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहन मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा
छत्रपती संभाजीराजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना धक्काबुक्की, गराड्यात पळ काढला
शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आले असता मराठा क्रांती मोर्चातील आक्रमक कार्यकर्ते चंद्रकांत खैरेंच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना अक्षरशः हाकलून देण्यात आहे, तसेच सुरक्षेच्या गराड्यात त्यांना त्यांच्या खासगी वाहनात बसवून निघुन जाण्यास सांगण्यात आलं.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी त्याने दिले प्राण
अन् त्याने मारली गोदावरीत उडी – मराठा आरक्षणासाठी कायगाव टोका येथे सुरू असलेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुणाने अचानक पुलाचा कठडा ओलांडून पाण्यात उडी घेतली.
7 वर्षांपूर्वी -
वादळ पुन्हा येणार? लवकरच मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या दिशेने?
मराठा क्रांती मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा येणार पुन्हा येणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या हजारो समर्थकांनी बुधवारी परळी तहसील कार्यालासमोर ठिय्या आंदोलन केले आणि हेच वादळ लवकरच मुंबईच्या दिशेने येतंय काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो