महत्वाच्या बातम्या
-
अन्यथा मराठा समाजाचं दुसरं सामाजिक पानिपत होईल | आ. शिवेंद्रराजेंचा गंभीर इशारा
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड राग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात जळगतीने पाउल उचलून तोडगा काढावा असं मत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढे या संदर्भात ते म्हणाले की मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाजा व्यथित किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाही असं देखील मत व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार महाविकास आघाडी सरकार उचलणार
मराठा आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात रखडल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठे शैक्षणिक पेच निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधातील पेच देखील वाढतांना दिसला आणि महाविकास आघाडी सरकार सुद्धा दबावाखाली असल्याचं पाहायला मिळालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावरी सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली
मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे. समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले. त्याचवेळी राज्य सरकार चांगली बाजू मांडेल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
4 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी | राजेंद्र कोंढरेंची उद्विग्न प्रतिक्रिया
मराठा समाजाची अवस्था ही कपाळावर कुंकू असूनही विधवेसारखी झाली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. राजेंद्र कोंढरे म्हणाले की, सगळी सत्व मराठा समाजानेच द्यावी अशी काहींची भूमिका आहे. मात्र, हे चुकीचे असून प्रत्येकवेळी मराठा समाजच समन्वयाची भूमिका घेणार नाही. आधीच मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असूनही विधवेसारखी झाली आहे असे कोंढरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा पुढे ढकलली | राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजा समाजाचा नव्हे तर रयतेचा असतो, मग तलवार कुणाविरुद्ध उपसणार? - वडेट्टीवार
मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. MPSC परीक्षा तात्काळ रद्द करावी, असी मागणी मराठा संघटनाकडूव करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात येत आहे. या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. यावेळी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. खासदार संभाजीराजे यांच्या या वक्तव्याला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये | संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल - प्रवीण गायकवाड
सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी करत संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
4 वर्षांपूर्वी -
आम्हाला गृहित धरू नका, वेळ आल्यास तलवारही काढेन | खा. संभाजीराजेंचा इशारा
आम्हाला गृहित धरू नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका. वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू असं वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. या मोर्चात खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. अशोक चव्हाण यांच्या घरासमोर येत्या 15 तारखेला आंदोलन करणार असल्याची घोषणाही यावेळी संभाजीराजे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
एक राजा बिनडोक तर दुसऱ्या राजांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर - प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळत “एक राजा बिनडोक आहे,” असं आंबेडकर म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | MPSC परीक्षांबाबत मुख्यमंत्री आज अंतिम निर्णय घेणार
मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना MPSC परीक्षा घेऊन नयेत अशी मराठा संघटनांची मागणी आहे (MPSC Prelim Exam 2020). या संदर्भात गुरूवारी (8 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. मेटे यांनी रात्री उशीरा मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रश्नावर सगळ्यांच्या भावना तीव्र असून त्या समजूनच निर्णय झाला पाहिजे असं आमचं मत असल्याचंही मेटे यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा घेतल्यास वाईट परीणाम भोगावे लागतील | परीक्षा केंद्रं बंद पाडू
आज नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच मराठा आरक्षणाच्याबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले असून, सरकारच्या हाती असलेल्या गोष्टीही राज्य सरकार करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही तर मराठा समाज एमपीएससी केंद्र बंद पाडेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात मराठा आरक्षणावरून बैठक | उदयनराजे, शिवेंद्रराजेंची बैठकीला अनुपस्थिती
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या पुढाकाराने आज पुण्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी मराठा विचार मंथन बैठक पार पडली. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी मराठा आरक्षण आंदोलनातील विविध नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांनाही वैयक्तिक आमंत्रण दिल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं. पण या नेत्यांपैकी कुणीही या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
१० ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला माझा पाठिंबा नाही | मराठा समाजात दोन गट
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा वातावरण पेटणार असं चित्र निर्माण झालंय. 9 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवणार अशी घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीनं देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा आरक्षणाच्या निकालापर्यंत पुढे ढकला | अन्यथा परीक्षा उधळून लावू
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी आय़ोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा-२०२० (MPSC Prelims 2020 Exam) साठी प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रं आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संदर्भात आयोगाच्यावतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात आग पेटवली आहे | त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होईल - पार्थ पवार
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाहीर भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा ट्वीट केलं आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे ट्वीट असून त्यामुळं पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भूमिकेचा अर्थ एकच | शिवसेनेनं फूट पाडणाऱ्यांना फटकारलं
‘सातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या भूमिकांचा वेगळा अर्थ कोणी काढू नये. छत्रपती शिवरायांनी कष्ट व शौर्यातून निर्माण केलेले हे महाराष्ट्र राज्य जातीपातीच्या लढाईत फाटू नये याची काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे’ असं म्हणत शिवसेनेनं मराठा आरक्षणावरून राजकारण करणाऱ्यांना फटकारून काढले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maratha Reservation | साताऱ्यात खा. उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि विनायक मेटे यांच्यात चर्चा
मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विचारमंथन बैठकीला छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित राहावे या साठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात येऊन दोन्ही राजांना निमंत्रण दिले. दोघांनीही मेटे यांचे निमंत्रण स्विकारले असल्याने उदयनराजे, शिवेंद्रराजे, मेटे यांची वज्रमूठ तयार झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा
सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेऊ, पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असं सांगण्यात आलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी आठ सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. तरी त्यावर मराठा समाजाचं समाधान झालेलं दिसत नाही. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचा ठराव मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत आज (23 सप्टेंबर) मंजूर करण्यात आला. या परिषदेत एकूण 15 ठराव मंजूर करण्यात आले असून हे सर्व ठराव राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती हटवा | ठाकरे सरकारचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकारवर टीका झाली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच यातून मार्ग काढू असं आश्वासन दिलं. तसंच मराठा बांधवांच्या मागण्यांच्या पाठिशी आम्ही कायम आहोत असंही म्हटलं होतं. त्यानुसार आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो