Marico Share Price | गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारा शेअर आता नव्या टार्गेट प्राईसच्या दिशेने झेपावतोय, स्टॉक डिटेल्स पहा
Marico Share Price | ऑइल-शॅम्पू सारखे दैनंदिन वापराचे वस्तू बनवणाऱ्या ‘मॅरिको लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी 0.52 टक्के वाढीसह 503.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. आता तज्ञांनी या स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, मॅरिको कंपनीचे शेअर्स 560 रुपये पर्यंत वाढू शकतात, जे सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 15 टक्के जास्त आहे. मॅरिको कंपनीचे अनेक ब्रँड बाजारात प्रसिद्ध आहे, जसे निहार, पॅराशूट ब्रँड ऑइल, लिव्हॉन, हेअर अँड केअर, सिल्क ब्रँड हेअर सीरम, सेट वेट ब्रँड जेल, सफोला ऑइल, ओट्स, पॅराशूट बॉडी लोशन. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Marico Share Price | Marico Stock Price | BSE 531642 | NSE MARICO)
2 वर्षांपूर्वी