महत्वाच्या बातम्या
-
Matrimonial Partner | वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार – हायकोर्ट
एका आंतरधर्मीय जोडप्याला संरक्षण देण्याचा निर्णय घेताना वयात आलेल्या मुला-मुलींना, त्यांचा धर्म (religion) कुठलाही असो पण त्यांना त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. पालकही त्यांच्या नात्यावर आक्षेप घेऊ शकत नाहीत, असे न्यायाधीश मनोज कुमार गुप्ता आणि न्यायाधीश दीपक वर्मा यांच्या खंडपीठाने सांगितले.
3 वर्षांपूर्वी -
Marathi Matrimony | तुम्ही तुमच्या साथीदारावर किती प्रेम करता? | स्वतःला हे प्रश्न विचार
प्रत्येकाला हे माहित आहे की नातेसंबंध जपतांना आपण किती जागृत असतो किंवा काही तरी नविन करून आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी किती उत्सुक असतो. आपण पहिल्यांदा प्रेमात (Love) पडतो आणि नंतर ते संबंध ते नातं स्थिर करण्यासाठी आपण एकमेकांशी बोलतांना वागतांना एक प्रकारची उत्सुकता दाखवत असतो. मात्र असे केल्यास आपल्या नातेसंबंधात तडजोड वाढत जाते. त्याच बरोबर भविष्यात मतभेद होण्याचीही भीती असते.
3 वर्षांपूर्वी -
Relationship | लग्न आणि अपेक्षा | आपण लग्नासाठी एक सजीव माणूस शोधतोय की ATM मशीन? - नक्की वाचा
काही दिवसांपूर्वी घरी ओळखीच्या एक मामी आल्या. त्यानंतर बऱ्याच गप्पा रमल्या. बोलता बोलता त्या सहज आईला म्हणाल्या, ‘तुमच्या सोनलच्याही खूप अपेक्षा आहेत का लग्नाबद्दलच्या? आमच्या प्राजक्ताने तर बाई आम्हाला जेरीस आणले आहे. गोरा आणि उंचच मुलगा हवा, मुंबईतीलाच मुलगा हवा, त्याला भरपूर लाखात पगार हवा. त्याने वर्षातून किमान दोनदा तरी परदेशात फिरायला घेऊन जायला हवे, हनिमूनलाही परदेशच हवा. त्याचा ३-४ बेडरूमचा फ्लॅट किंवा स्वतःचा बंगला असावा.
4 वर्षांपूर्वी -
Marathi Matrimony | कितीही प्रयत्न करुन लग्न जुळत नाही? | ही असू शकतात कारणं - नक्की वाचा
आयुष्यात काहीही झाले तरी वर हात दाखवून ते सगळं वरच्याच्या हातात असे कायम म्हटले जाते. आयुष्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टी होण्यासाठी देवाला आणि नशिबाला नेहमी दोष दिला जातो. लग्नाच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. लग्न ठरणे न ठरणे , योग जुळणे न जुळणे या गोष्टी कितीही खऱ्या असल्या तरी देखील त्यासाठी नशिबाला दोष देण्याची सवयच आपल्याला लागलेली आहे. पण लग्न हा आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय तो घेताना थोडासा विचार आणि वेळ घ्यावा लागतो. कधी कधी जुळणार जुळणार आता लग्न जुळणार असे वाटत असले तरी ते स्थळ चांगले असून लग्न जुळत नाही. लग्न जुळत नाही म्हटल्यावर घरात अनेकांना टेन्शन येऊ लागते. विशेषत: घरात असणाऱ्या मुलींची लग्न होत नसतील तर पालकांना अधिक काळजी वाटू लागते. पण आयुष्यात अशा काही गोष्टी संकेत देत असतात. त्या गोष्टी चुकवून चालत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करु नका.
4 वर्षांपूर्वी -
Marathi Matrimony | मंगळाचा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
ज्योतिषानुसार पत्रिकेत एकूण 9 ग्रह सांगितले जातात. हे ग्रह पत्रिकेत वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या 1,4,7,8,12 या स्थानावर जर मंगळ असेल तर अशा व्यक्ती या मंगळदोषाच्या असतात असे म्हटले जाते. पत्रिकेत सगळेच ग्रह वेगवेगळ्या स्थानी असतात. पण या स्थानी मंगळ आला की, हा मंगळदोष मानला जातो. मंगळ असलेल्या व्यक्तीला काही समस्यांना नक्कीच सामोरे जावे लागते. मंगळाच्या प्रभावाखाली पत्रिका किती आहे या नुसार कडक मंगळ, सौम्य मंगळ असे ठरवले जाते. मंगळदोषाखाली असलेल्या व्यक्ती या अधिक वेगळ्या स्वभावाच्या असतात.
4 वर्षांपूर्वी -
अरेंज मॅरेज करताना ह्या ५ गोष्टींची काळजी घ्या | नाहीतर पुढे पश्चात्ताप करायची वेळ येईल
सध्याच्या लव्ह मॅरेजच्या जमान्यात आजही अनेक जण असे आहेत जे अरेंज्ड मॅरेजवर विश्वास ठेवतात. खासकरून मुली ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य करियरला वाहीलेलं असतं, त्यांना अजिबात प्रेमात पडायला वगैरे वेळ मिळालेला नसतो किंवा आई वडिलांच्या मर्जी विरुद्ध लग्न करायचं नसतं, त्या मुलींची अरेंज्ड मॅरेज करून छानसा जोडीदार निवडायची इच्छा असते. शेवटी लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय असतो. हा निर्णय चुकला तर सगळं आयुष्य उध्वस्त होऊ शकतो. म्हणूनच त्या आधी काही शहानिशा करून मग सारासार विचार करून निर्णय घेतलेला योग्य!
4 वर्षांपूर्वी -
Matrimony Video | सुरत येथील लग्नात तब्बल 6 कोटींचे फक्त डेकोरेशन | १०० पाहुणे
लग्न समारंभ हे फक्त दोन जीवांचे मिलन नसून याद्वारे दोन कुटुंबे एकत्र येतात. म्हणूनच की आपल्या आयुष्यातील हा क्षण अगदी खास असावा असे प्रत्येकालाच वाटते. भारतामध्ये ‘लग्न’ या गोष्टीला फार महत्व आहे. लग्नाची सजावट, खाणेपिणे, कपडे, दागिने, पाहुण्यांचे आदरातिथ्य, विविध कार्यक्रम अशा अनेक गोष्टींचा समावेश भारतीय लग्नामध्ये असतो. काही ठिकाणी तर 7-8 दिवस लग्न चालते. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या लग्नातील फक्त सजावटच तब्बल 6 कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०२० मध्ये अनेकांच्या लग्नात विघ्न आले | २०२१ मध्ये हे आहेत लग्नाचे शुभ मुहूर्त
२०२० मध्ये कोरोनाने प्रवेश केला आणि अनेकांचे लग्नाचे स्पप्न भंगले. मात्र आता वातावरण निवळू लागलं आहे आणि कोरोना लस सुद्धा आल्याने अनेकांनी नवीन वर्षात लग्नाचे मुहूर्त शोधण्यास सुरुवात केली आहे. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. नवीन वर्ष 2021 मध्ये लग्नाचे मुहूर्त कमी आहेत. ज्योतिष पंचागानुसार, जानेवारी महिन्यात लग्नाचा मुहूर्त अत्यंत कमी असतो. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये केवळ 18 जानेवारी हा लग्नाचा मुहूर्त असणार आहे. याशिवाय मे 2021 मध्ये यावर्षी विवाहासाठी सर्वाधिक 16 मुहूर्त असणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांत, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये लग्नासाठी कोणताही शुभ काळ नाही. याशिवाय ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्येदेखील लग्नाचा शुभ मुहूर्त नाही. जर तुम्ही स्वत: च्या किंवा आपल्या घरातील इतर व्यक्तीच्या विवाहाचा विचार करत असाल, तर तुम्हाला 2021 या वर्षातील शुभ विवाहाच्या तारखा जाणून घेण्यासाठी खालील माहिती नक्की उपयोगात येईल.
4 वर्षांपूर्वी -
Matrimony | लग्न ठरवताना घ्यायची सावधगिरी
भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मानसिकदृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना हैराण करतात. पण लग्न ही इतकी सोपी गोष्ट नाही. अजूनही आपल्याकडे लग्न ठरवताना बरेचदा एकदा झालेल्या चहा-पोह्यांवर, एक्-दोनदाच्या झालेल्या ओझरत्या भेटींवर, कुणा मध्यस्थावर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो. बरेचदा आयुष्यभर बरोबर राहूनही माणसे कळत नाहीत, तर ह्या तुटक भेटी/माहितीच्या आधारावर कशी कळतील? अर्थात लग्न ठरवण्याचा हा ट्रेंड हळूहळू बदलतोय, काही वेळा मुले – मुली स्वतःच लग्न ठरवतात तर काही वेळा चॅटींग/डेटींग करून, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स द्वारे ठरवतात.
4 वर्षांपूर्वी -
Matrimony | लग्न झाल्यावर मुली चिडचिड्या का होतात | कारणं जाणून घ्या
लग्नानंतर प्रत्येक मुलीचे आयुष्य खूप बदलते. मुलीचे फक्त घरच बदलत नाही तर तिच्या अनेक सवयीसुद्धा बदलतात. ज्या घरात ती आधी राहात होती अचानक ते घर तिला परके होते. त्याच वेळी सासरी सगळे नवीन असते. अशा वेळी अनेक आव्हाने तिला पेलवावी लागतात. इतके सगळे झेपावताना परीणामी मुली खूप चिडचिड्या होतात. तर आता पाहूया अशी काय कारणे आहेत ज्यामुळे मुली लग्न झाल्यावर चिडचिड्या होतात.
4 वर्षांपूर्वी -
Matrimony | लग्न करण्याचे का टाळतात नव्या पिढीच्या मुली | काय आहेत कारणं
नव्या पिढीतील मुली चांगल्या मुलाच्या शोधात आणि करीयरच्या कारणाने लग्नापासून लांब पळतात. बरेचदा मनासारखा जोडीदार मुलींना सहज मिळत नसतो. आज जमाना बदलत असल्याने या बाबतीत सगळ्यांचे विचार बदलले आहेत. आता प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहली यांच्या नात्याबाबत बोलायचे झाल्यास आधी अनुष्का या बंधनात राहायला तयार नव्हती. अशातच विराटने अनकेदा प्रपोज करूनही तिने होकार दिला नव्हता. खरे तर प्रत्येक मुलीच्या मनात लग्न या विषयी काही त्रास असतात आणि त्यासाठी त्या लवकर या नात्यात पडायला तयार नसतात. चला पाहूया याबाबत मुलींचे विचार काय आहेत ते.
4 वर्षांपूर्वी -
मॅट्रिमोनी वेबसाईटवर स्थळ केव्हा नाकारलं किंवा स्वीकारलं जातं?...ही आहेत कारणं
आज देशभरात एकूण पुरुष आणि स्त्रियांमधील प्रमाण अत्यंत वाईट आहे. त्यामुळे लग्नाच्या विचारात असणाऱ्यांना लग्न जुळवताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगदी त्यात खूप शिक्षण आणि पगार असणाऱ्या वधू-वरांची देखील तीच अवस्था असल्याचं पाहायला मिळतं. मात्र देशभरातील मँट्रिमोनी साईट्स म्हणजे ऑनलाईन वधू-वर नोंदणीची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या संशोधनात अजून काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळे वधू किंवा वराने जरी एखाद्याला इंटरेस्ट पाठवले तरी त्यावर प्रतिक्रिया (होकार-नकार) येत नाहीत, अथवा नकारच अधिक येतात.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50