Mercury EV Tech Share Price | आजही शेअरची किंमत 25 रुपये, एका वर्षात 2,713 टक्के परतावा दिला, 1 लाखाचे झाले 27 लाख रुपये
Mercury EV Tech Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मल्टीबॅगर परतावा कमवू इच्छित असाल तर तुम्ही ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर कमाई करून दिली आहे. ‘मर्क्युरी इव्ही टेक’ ही कंपनी Mercury Metals Limited या नावाने ओळखली जात होती. ‘मर्क्युरी इव्ही टेक’ ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती उद्योगात गुंतलेली आहे. 7 जून रोजी ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.01 रुपये प्रति किमतीवर क्लोज झाले होते. ‘मर्क्युरी इव्ही टेक’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 417.34 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 27.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी