Midday Meal Scheme | मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार - मंत्री भुजबळ
महाराष्ट्रात 18 लाख 75 हजार 510 इतके नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. त्यातील 34 हजार 473 बांधकाम मजूर नाशिक जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे नोंदणीकृत व पात्र बांधकाम कामगारांना मंडळाने जाहिर केलेल्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजनेद्वारे विविध लाभ दिले जात आहे. त्यात शासनाच्या महत्वाकांक्षी ‘मध्यान्ह भोजन योजनेचा’ (Midday Meal Scheme) शुभारंभ झाला असून या योजनेअंतर्गत बांधकाम मजूरांना सकस आहार मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
3 वर्षांपूर्वी