महत्वाच्या बातम्या
-
यूपीत भाजपच्या यशस्वी वाटचालीसाठी मियाँ असदुद्दीन ओवेसींचा पक्ष पडद्यामागून कामाला लागलाय - शिवसेना
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे. तसे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन(AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रचाराचा जोर वाढत चालला आहे. मात्र ‘मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल.’ असे म्हणत शिवसेनेने ओवेसींवर तोफ डागली आहे.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत यादव-मुस्लिम वोट बँके फोडून एमआयएम अप्रत्यक्षरीत्या भाजपाला मदत करतंय?
उत्तर प्रदेशात वर्षानुवर्षे मुस्लिम समाज समाजवादी पार्टीला मतदान करतो आहे. मुलायम सिंग यादव यांच्या काळापासून त्यांनी 11% यादव आणि 19 टक्के मुस्लिम मतांची गोट बँक समाजवादी पार्टीबरोबर घट्ट बांधून टाकली आहे. ही वोट बँकच फोडण्याचा हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा प्रयत्न आहे.
3 वर्षांपूर्वी -
एमआयएम'ची भूमिका भाजपच्या फायद्याची? | उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत १०० जागा लढवणार
उत्तर प्रदेशमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. आजच बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी स्वबळचा नारा देत, एमआयएम सोबतच्या आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता एमआयएम कडून देखील या निवडणुकीच्या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले तेथे भाजपचा पराभव झाला - असदुद्दीन ओवैसी
हैदराबाद महापालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. रात्री दहा वाजता हाती आलेल्या बातमीनुसार, भारतीय जनता पक्षाने जोरदार धक्के देत तेलंगण राष्ट्र समितीसह एमआयएमला विचार करायला भाग पाडले आहे. मागील निवडणुकीत केवळ तीन जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत 48 जागा जिंकल्या आहेत. टीआरएसला सर्वाधिक 55 तर एमआयएमला 44 जागा मिळाल्या आहेत. तर कॉंग्रेसला अवघ्या 2 जागा मिळाल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
जनजीवन सुरळीत करायचं असल्यास तो परिसर लष्कराच्या ताब्यात द्या: ओवेसी
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीतील जाफराबाद येथील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचारात एकूण ७ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात एक पोलीस आणि ६ नागरिकांचा समावेश आहे. तर ७५ हून अधिकजण जखमी झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचार लवकर न थांबल्यास त्याची व्याप्ती वाढेल: ओवेसी
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीतील जाफराबाद येथील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचारात एकूण ७ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात एक पोलीस आणि ६ नागरिकांचा समावेश आहे. तर ७५ हून अधिकजण जखमी झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
देशभरातून टीका; अखेर माफी मागितल्यावर वारिस पठाण म्हणाले, जय हिंद!
मला आणि ‘एमआयएम’ला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझे ते वक्तव्य हिंदूविरोधी नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, असे एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथे जाहीर सभेत पठाण यांनी १०० जणांना १५ कोटी भारी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण तापले. यावरती पठाण यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत मी ते वक्तव्य मागे घेतो असे स्पष्ट केले.
5 वर्षांपूर्वी -
मी एकटी नाही, जे मी करतेय त्यामागे एक मोठी टीम काम करतेय: अमुल्या
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) आयोजित करण्यात आलेल्या सभेत गुरुवारी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा देणाऱ्या एका तरुण महिलेविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तिची कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. दरम्यान, या महिलेचे यापूर्वी नक्षलवाद्यांशी संबंध होते, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुढील आदेशापर्यंत माध्यमांपासून लांब रहा, एमआयएम'चे वारीस पठाण यांना आदेश
१५ कोटी १३५ कोटींना भारी पडतील असं वक्तव्य करून वाद निर्माण करणारी वारिस पठाण यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांची खप्पामर्जी ओढवलीय. पठाण हे AMIM’चे महाराष्ट्रातले नेते आणि माजी आमदार आहेच. पठाण यांच्या वक्तव्यामुळे ओवेसे हे अत्यंत नाराज आहेत. पुढील आदेशापर्यंत त्यांना माध्यमांना बोलण्यास बंदी घातली आहे. पठाण वारंवार अशी वक्तव्य करतात त्यामुळे वाद निर्माण होतो. त्याचबरोबर समाजात चुकीचा संदेश पसरतो अशी पक्षाची भावना आहे. त्यामुळे त्यांना बोलण्यास बंदी घालण्यात आलीय. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पठाण हे विजयी झाले होते. मात्र २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
5 वर्षांपूर्वी -
वादग्रस्त वक्तव्यानंतर वारिस पठाण म्हणाले, माफी मागणार नाही!
वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचे झोड उडत आहे. वारिस पठाण यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला असून भाजपाला लक्ष केलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलतना वारिस पठाण म्हणाले की, ‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. भाजपा आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळं करण्याच्या घाट घालत आहे.’
5 वर्षांपूर्वी -
VIDEO- 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा देणारी अमूल्या न्यायालयीन कोठडीत
नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात (CAA) बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. या तरुणीचं नाव अमूल्या असं आहे. उल्लेखनीय म्हणजे, ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मसलमीन’ (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर अमूल्यानं या घोषणा दिल्या.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही इतके, तुम्ही तितके..अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना इतकंच सांगतो...तर मनसे दणका?
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे वादग्रस्त नेते माजी आमदार वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवणारं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एमआयएम’चे मुंबईतील माजी आमदार वारीस पठाण अशी वक्तव्य करण्यात माहीर असून, यापूर्वी देखील त्यांनी अशी धार्मिक भावना भडकवणारी विधानं केली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत; वारीस पठाण यांचं संतापजनक वक्तव्य
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे वादग्रस्त नेते माजी आमदार वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवणारं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एमआयएम’चे मुंबईतील माजी आमदार वारीस पठाण अशी वक्तव्य करण्यात माहीर असून, यापूर्वी देखील त्यांनी अशी धार्मिक भावना भडकवणारी विधानं केली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का? इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंना टोला
पक्षांतर्गत निर्माण झालेली खदखद आणि ‘माधव’ सूत्राच्या भोवती फिरणारी राजकीय अपरिहार्यता यातून सोमवारी औरंगाबाद येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलनास जलसमस्यांचे आवरण देण्यात भाजपच्या नेत्यांना यश आल्याचे दिसून आले. हे उपोषण गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने घेण्याचे पूर्वी पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्यावतीने हे उपोषण असल्याचे सांगितले आणि सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पक्षाचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना धर्मनिरपेक्ष झाल्याने मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला: खा. इम्तियाज जलील
“इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का?” असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे. “धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय?” असा सवाल राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात उपस्थित केला होता. तसंच राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देत, सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली.
5 वर्षांपूर्वी -
हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनास खासदार इम्तियाज जलील यांची दांडी
हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार आणि एआएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा दांडी मारली आहे. आमदार झाल्यापासून जलील मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुस्लिम मतं मिळत नसल्याने MIM'ला फक्त ८ जागा; वंचित आघाडी तुटणार? सविस्तर
लोकसभा निवडणुकीत आश्चर्यकारत मते मिळवित चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीचं आगामी विधानसभा निवडणुकीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. एमआयएम आणि भारिप बहुजन आघाडी यांना लोकसभा निवडणुकीत लाखांच्या पुढे मतदान झालं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात अपेक्षा लागून राहिल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही कॉंग्रेससोबत आघाडीला तयार; पण आघाडीत राष्ट्रवादी नको: वंचितची अट
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित आघाडीची जोरदार चर्चा रंगली आणि त्यांच्यामुळे काँग्रेसचे किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर आली. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी तब्बल ४० लाखांहून अधिक मतं घेतल्याचे पाहायला मिळाले. वंचित आघाडीच्या उमेद्वारांमुळे लोकसभेत काँग्रेसच्या तब्बल ८ जागा पडल्या होत्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने वंचित आघाडीला सोबत घेण्याच्या जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
वंचितांच्या कल्याणासाठी प्रकाश आंबेडकरांच्या लढ्याला नक्कीच यश मिळणार: अण्णाराव पाटील
भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने आणि आमच्यात काही मतभेद नक्की आहेत, परंतु मनभेद अजिबात नाहीत. माने आज देखील पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, पक्षाने त्यांना आद्यप देखील काढलेले नाही, तसेच पक्षापासून ते अलिप्त नाहीत. परंतु त्यांनी केलेले आरोप हा केवळ स्टंट बाजीपणाचा प्रकार होता, अशी टीका वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर केली. लातूर येथे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
गडकरी हे केंद्रातील सर्वात चांगलं काम करणारे मंत्री: खासदार इम्तियाझ जलील
औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी पुन्हा त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचं उदाहरण समोर ठेवलं आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील खासदार म्हणून मुद्देसूदपणे संसदेत शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी बोलून दाखवल्या होत्या. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर कामाची स्तुती केली होती, तसेच त्यांच्यातील अभ्यासू पत्रकार देखील त्यावेळी सभागृहाने अनुभवाला होता.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY