MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार
MM Forgings Share Price | ‘एमएम फोर्जिंग’ या कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश रूपाने मजबूत परतावा मिळवून दिला आहे. या ऑटो ऍन्सिलरी कंपनीच्या स्टॉकने 2023-24 या आर्थिक वर्षात आपल्या शेअर धारकांना 6 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून 29 मे 2023 हा दिवस निश्चित केला होता. एमएम फोर्जिंग कंपनीच्या संचालक मंडळाने 17 मे 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत शेअर धारकांना प्रति शेअर 6 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनी लाभांश रक्कम 15 जून किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करेल. आज मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 856.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी