Neelam Gorhe | विधानसभेत निवडून येणं शक्य नसणाऱ्या आणि विधान परिषद भरोसे राजकारण करणाऱ्या महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश होणार
Neelam Gorhe | राज्यातील राजकारणात वर्षभरापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असल्याने सत्तेच्या गुळाकडे मुंगळे चिकटतात तसे प्रकार असून सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार गेल्यानंतर अनेक धक्के उद्धव ठाकरे यांना बसले आहे. आता शिवसेना ठाकरे गटातून आणखी एक नेत्या शिंदे गटात दाखल होणार आहे. हा प्रवेश शुक्रवारीच होण्याची शक्यता आहे. मात्र त्याने ठाकरे गटाला गटाला आगामी कोणताही फरक पडेल असं दिसत नाही. कारण या नेत्याचं स्वतःच्या हिंमतीवर निवडणून येण्याइतकं मोठं राजकीय राजकीय वजन नाही. या महिला नेत्याचं राजकारण हे पूर्णपणे विधान परिषद भरोसे निवडून जाण्यावर अवलंबून असल्याचे राजकीय तज्ज्ञ सांगतात.
2 वर्षांपूर्वी