Mobile Downloading Speed | मोबाइल डाउनलोड स्पीडच्या बाबतीत भारताचे वर्ल्ड रँकिंग अजून खाली घसरले
स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सनुसार, मोबाइल डाउनलोडच्या मध्यम वेगाच्या बाबतीत भारताच्या जागतिक क्रमवारीत 3 स्थानांची घसरण झाली आहे. मे महिन्यात या निर्देशांकात भारताचे स्थान 115 वे होते, जे जूनमध्ये 118 व्या क्रमांकावर घसरले आहे. मे महिन्यात भारताचा सरासरी मोबाइल डाऊनलोडिंग स्पीड 14.28 एमबीपीएस होता, जो जूनमध्ये 14.00 एमबीपीएसपर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारताचे रँकिंग सुधारले असून, ते ७५व्या स्थानावरून ७२व्या स्थानावर पोहोचले आहे.
2 वर्षांपूर्वी