ओल्टन्युज फॅक्टचेकच्या पत्रकाराला अटक | मुद्दा संयुक्त राष्ट्रात | भाजप आयटीसेलच्या फेक न्युजची पोलखोल करण्याचा विक्रम
दिल्ली पोलिसांच्या सायबर पथकाने सोमवारी (27 जून) अल्टन्यूज या फॅक्ट चेकिंग वेबसाईटचा सहसंस्थापक मोहम्मद जुबैर याला अटक केली होती. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, पत्रकार जे लिहितात, ट्विट करतात किंवा बोलतात त्याबद्दल त्यांना तुरुंगात टाकू नये. एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारले होते की, झुबैरच्या सुटकेसाठी फोन केला आहे का? हिंदू देवतेविरोधात 2018 मध्ये केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटप्रकरणी जुबैरला अटक करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी