Monsoon Alert | अजून घाम निघणार? मान्सूनची तारीख पे तारीख, केरळमध्ये मान्सून कोणत्या तारखेला दाखल होणार पहा
Monsoon Alert | मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. यापूर्वी हवामान खात्याने ४ जूनला मान्सूनदाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर तो बदलून ७ जून करण्यात आला होता. आता मान्सूनला आणखी उशीर होऊ शकतो, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. मान्सूनच्या आगमनाची कोणतीही तारीख देण्यात आलेली नाही. आधी ढगाळ आणि वाऱ्यामुळे मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असे वाटत होते, पण नंतर अरबी समुद्रात बदल झाला. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ढग कमी झाले.
2 वर्षांपूर्वी