Monthly Income Plan | तुम्हाला नियमित उत्पन्नाची सोय करायची आहे का? MIP मध्ये गुंतवणूक केल्यास कमी जोखमीत जास्त परतावा मिळेल
Monthly Income Plan | MIP म्युचुअल फंड योजनाना कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड असे देखील म्हणतात. या फंडपैकी सुमारे 75-90 टक्के गुंतवणूक कर्ज रोख्यामध्ये केली जाते आणि उर्वरित 10 ते 25 टक्के रक्कम इक्विटी मार्केटमध्ये गुंतवली जाते. अशा संमिश्र पोर्टफोलिओमुळे गुंतवणूकीत सुरक्षितता आणि केलेल्या गुंतवणुकीवरील परतावा यामध्ये समतोल राखला जातो. शेअर बाजारावर विपरीत परिणाम असला किंवा पडझड असली तरीही या योजनेतील परताव्यावर जास्त परिणाम होत नाही. MIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आणि लॉक-इन कालावधीही नाही. तुम्ही हवी तेवढी रक्कम दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी