Post Office Scheme | या पोस्ट ऑफिस योजनेत 10 वर्षांवरील मुलांच्या नावाने खाते उघडा, मिळवा दरमहा 2500 रुपये व्याज, अधिक जाणून घ्या
Post office Scheme | पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या जवळच्या शाखेमध्ये उघडता येतात. या अंतर्गत योजनेअंतर्गत किमान गुंतवणूक मर्यादा 1000 रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 4.5 लाख रुपये ठरवण्यात आली आहे. सध्या पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत व्याज दर 6.6 टक्के निश्चित करण्यात आला आहे. जर तुमच्या मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा अधिक असेल, तर तुम्ही MIS योजना खाते उघडून त्यांच्या नावावर गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे असून, मुदतपूर्तीनंतर गुंतवणूक हवी तेव्हा बंद करता येते.
2 वर्षांपूर्वी