MOS Utility IPO | आजपासून हा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, कंपनीबद्दल सविस्तर माहिती आणि GMP जाणून पैसे लावा
MOS Utility IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून बक्कळ कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आली आहे. शेअर बाजारात आज शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 पासून ‘एमओएस युटिलिटी लिमिटेड’ कंपनीचा IPO सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. हा IPO गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. ‘MOS युटिलिटी’ कंपनी आपल्या IPO मध्ये 10 रुपये दर्शनी मूल्याचे 65,74,400 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या IPO मध्ये 57,74,400 फ्रेश इक्विटी शेअर्स आणि कंपनीचे प्रवर्तक 8,00,000 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकणार आहेत. कंपनीने आपल्या शेअरची किंमत बँड 72 ते 76 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. (MOS Utility Limited)
2 वर्षांपूर्वी