MSME Credit Card | किसान क्रेडिट कार्डप्रमाणे देणार बिझनेस क्रेडिट कार्ड, छोट्या व्यवसायांना स्वस्त कर्ज मिळणार
मोदी सरकार किसान क्रेडिट कार्डच्या धर्तीवर छोट्या उद्योगांना ट्रेड क्रेडिट कार्ड देण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे व्यवसाय आणि एमएसएमईंना काहीही गहाण न ठेवता स्वस्त कर्ज मिळू शकेल. व्यवसाय क्रेडिट कार्ड राष्ट्रीय स्तरावर सुरू करता येणार असून सिडबी ही बिझनेस कार्डची नोडल एजन्सी असेल, असे सांगण्यात येत आहे. या संदर्भात अर्थ मंत्रालय आणि विविध बँकांशीही समितीने चर्चा केली आहे. या कार्डची क्रेडिट लिमिट 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असू शकते. म्हणजेच छोट्या व्यावसायिकांना एक लाखापर्यंत कर्ज घेता येणार आहे.
3 वर्षांपूर्वी