महत्वाच्या बातम्या
-
ज्ञानदेव वानखेडेंना झटका | ते सरकारी अधिकारीही आहेत, मलिकांचं ट्विट चूक असल्याचं सिद्ध करा - मुंबई हायकोर्ट
समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मानहाणीचा खटला दाखल केलाय. ह्या खटल्याची काल सुनावणी झाली आणि त्यात वानखेडेंनाच कोर्टानं खडे बोल सुनावलेत. समीर वानखेडे हे एक सरकारी अधिकारी आहेत आणि त्यांच्या कामाची सार्वजनिक समिक्षा होऊ शकते अशा स्पष्ट शब्दात बॉंबे हायकोर्टानं खडसावलय. याच प्रकरणात नवाब मलिक यांचे वकिल 12 नोव्हेंबरला प्रतिज्ञापत्र दाखल करतील.
3 वर्षांपूर्वी -
Lars Vilks | स्वीडिश व्यंगचित्रकार लार्स विल्क्सच्या मृत्यूनंतर रझा अकादकडून मिठाई वाटप
मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणारे स्वीडनचे व्यंगचित्रकार लार्स विल्क्स (Lars Vilks) यांचा अपघाती मृत्यू झाला. यापूर्वी ते दोनवेळा अपघातातून वाचले होते. 14 वर्षांपूर्वी त्यांनी पैगंबरांचे व्यंगचित्र काढले होते. त्यानंतर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. दोनदा ते हल्ल्यातून वाचले होते. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Coastal Road Project | मुंबईतील सागरी प्रकल्पाच्या सागरी हद्द व्यवस्थापन आराखड्याला केंद्राची मंजुरी
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर क्षेत्रासाठी असलेल्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान (सीझेडएमपी) आराखड्याला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. याचा फायदा मुंबईतील प्रलंबित सागरी प्रकल्पांना होणार आहे. आता बांधकामाची मर्यादा ५०० मीटरवरून थेट ५० मीटरपर्यंत कमी झाली आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Coastal Road Project | मुंबई कोस्टल रोडचं ४० टक्के काम पूर्ण | जुलै 2023 मध्ये खुला होण्याची शक्यता
मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्पातील (27 किमी) म्हणजे आता 40% पूर्ण झालं आहे. बीएमसीने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (27 किमी) 40% पूर्ण झालं आहे, ज्यामध्ये मलबार हिल अंतर्गत 1 किमी लांब, 40 फूट व्यासाचा बोगदा पूर्ण केल्याचं म्हटलं गेलंय. यानंतर केवळ 900 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण करायचे शिल्लक आहे. 40 फूट व्यासाचा हा भारतातील पहिला सागरी बोगदा असेल अशी देखील माहिती समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Bridge Collapse in Mumbai | मुंबई वांद्रे कुर्ला येथे पहाटे उड्डाणपुलाचा एक गर्डर निखळून खाली पडला | 14 कामगार जखमी
वांद्रे कुर्ला येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग कोसळला आहे. यामध्ये 14 कामगार जखमी झाले आहेत. यातील जखमी सर्वांना बीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आणि बचावकार्य सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी तूफान गर्दी
मुंबईत मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव एका दिवसावर आला आहे. त्यामुळे भाविकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली आहे. मार्केटमधील गर्दी पाहिल्यास कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
अमराठी लोंढ्यांना खुलं मैदान | पण कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांची होणार RT-PCR टेस्ट
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात लाखो चाकरमानी जातात. कोकणात कोरोना, डेल्टा प्लसचा या विषाणूचा प्रसार असल्याने मुंबईत परतत असताना चाकरमान्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील. तसेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्याही पहिल्याच दिवशी आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
२ डोस घेतलेल्या मुंबईकरांना ६५ रेल्वे स्थानकांवर मिळणार पास | अॅप विषयी देखील महापौरांची माहिती
सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. विरोधकांकडून यासाठी आंदोलन देखील केलं गेलं. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मुंबईच्या लोकलमधून प्रवासाची परवानगी दिल्याची घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
वाहनांच्या आड कपल्सचे अश्लील चाळे | कॉलनीला लावावे लागले 'नो किसिंग झोन'चे फलक
मुंबईतील एका सोसायटीमध्ये पेन्ट करण्यात आलेले फलक सध्या चर्चेत आहे. या ठिकाणी एका सोसायटीतील लोकांनी आपल्या पार्किंगच्या जागी ‘NO KISSING ZONE’ (नो किसिंग झोन) असे ठळक अक्षरांमध्ये पेन्ट केले आहे. स्थानिकांच्या मते, या ठिकाणी येणाऱ्या रोजच्या प्रेमी युगुलांमुळे ते कंटाळले होते. लॉकडाउनच्या काळापासूनच या ठिकाणी कपल्स येण्यास सुरुवात झाली होती. त्यांना थांबवण्यासाठी सोसायटीने हा प्रयत्न केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनलॉक सुरु झाला | मुंबईकर सुद्धा सुटले | रस्त्यावर तुफान ट्राफिक, अन गल्लोगल्ली लोकांची गर्दी
कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. आता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करायला सुरुवात केली आहे. त्यासोबतच कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. सोमवारी मुंबई अनलॉक होताच मुंबईकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसले. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | 11 तासानंतर समुद्राच्या जीवघेण्या लाटांमधून सुटका, ONGC कामगार ढसाढसा रडला
प्रचंड वेगाने वाहणारे वारे. खळवलेल्या समुद्र आणि ६ ते ८ मीटर उंचीच्या जीवघेण्या लाटा. अगदी मृत्यूच चाल करून येतोय असं वाटावं. तौते चक्रीवादळ मुंबईपासून जात असताना अरबी समुद्रात हे दृश्य होतं, ‘बॉम्बे हाय’ परिसरातील. तराफ्यांवर असलेल्या लोकांना एकाच वेळी मृत्यूने चौहीबाजूंनी जणू वेढाच दिला होता. त्यात तराफाच भरकटला आणि बुडायला लागला. तराफ्यावरील लोकांच्या पायाखालून जमीनच सरकरली. पण तरीही धीर न सोडता त्यांनी तब्बल ११ तास संकटाशी लढा दिला आणि सुखरूप बाहेरही पडले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | कतारवरून ४० टन ऑक्सिजन घेऊन महाकाय जहाज मुंबईत, आदित्य ठाकरेंची उपस्थिती
देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. परिणामी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजनचा शास्त्रीय आधारावर पुरवठा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एका कृतिदलाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे. हे कृतिदल ऑक्सिजन वितरणाची एक निश्चित कार्यप्रणाली तयार करेल. संपूर्ण देशातील ऑक्सिजनची गरज, त्याची उपलब्धता आणि वितरण या आधारावर मूल्यांकन करून कार्यप्रणाली निश्चित केली जाईल.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई | विकेंड लॉकडाऊन'मध्ये कसे असणार नियम? महापालिकेने दिली माहिती
मुंबईतील सर्वात मोठ कोविड लसीकरण केंद्रही बंद झालं आहे. बीकेसीमधलं जम्बो कोविड लसीकरण केंद्र लसीच्या पुरवठ्याअभावी बंद झालं आहे. सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या लोकांना बाहेर येऊन परत जाण्याची विनंती करण्याची वेळ डॉक्टर आणि पोलिसांवर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोर्टाच्या आदेशानुसार कंगना विरोधात देशद्रोहाचा गुन्हा | वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु
अभिनेत्री कंगना रनौत विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295a आणि 153a या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल आहे. मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्ट असलेल्या मूनवर अली सय्यद यांनी कोर्टात अर्ज करून कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | कंगना मुंबईत आली की धाडली? | अनेकांना शंका - सविस्तर वृत्त
सध्या देशात शेतकरी आंदोलन जोरदारपणे सुरु आहे. कालच्या वृत्तानुसार शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधी दरम्यान बैठक होणार आहे. सरकारने अनेक फंडे अवलंबले शेतकरी विचलित न झाल्याने मोदी सरकारची झोप उडाली आहे आणि त्यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला आहे. आंदोलनावर तोडगा न निघाल्यास शेतकरी अधिक आक्रमक होण्याची केंद्र सरकारला खात्री आहे. त्यामुळे प्रसार माध्यमं तिकडे केंद्रित झाल्यास सरकारच्या अडचणी वाढू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातून राज्यसभेवर | त्यांचंच मंत्रालय राज्याच्या विकासात अडथळे आणतंय? - सविस्तर
मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी कांजूरमार्ग (Mumbai Metro 3 Kanjur Marg Land ) येथील १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात त्रुटी असल्याने त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा व नव्याने सुनावणी घ्यावी, अन्यथा आम्ही त्या आदेशाची वैधता ठरवू,’ असा इशारा न्यायालयानं दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड | राज्य सरकारने दर्शवली जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मागे घेण्याची तयारी
मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी कांजूरमार्ग (Mumbai Metro 3 Kanjur Marg Land ) येथील १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात त्रुटी असल्याने त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा व नव्याने सुनावणी घ्यावी, अन्यथा आम्ही त्या आदेशाची वैधता ठरवू,’ असा इशारा न्यायालयानं दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
कांजूरमार्ग मुंबई मेट्रो-३ प्रकल्प | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात त्रुटी | कोर्टाकडून हे आदेश
मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात त्रुटी असल्याने त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा व नव्याने सुनावणी घ्यावी, अन्यथा आम्ही त्या आदेशाची वैधता ठरवू,’ असा इशारा न्यायालयानं दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांसाठी | 9 आणि 10 डिसेंबरला शहरातील 'या' भागात पाणीपुरवठा बंद राहणार
मुंबई महानगरपालिकेने (Brihan Mumbai Mahanagar Palika) सुमारे चार किलो मीटर लांबीची ब्रिटीशकालीन तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे या कामासाठी येत्या 9 व 10 डिसेंबर रोजी एस विभागातील काही परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत (Water supply will be cut off in some areas of S section on December 9 and 10 for work) आहे. तर, याच दिवशी के पूर्व, एच पूर्व, एल उत्तर आणि जी उत्तर या विभागांमधये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे या सदर विभागातील नागरिकांना 8 डिसेंबर रोजी पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे तसेच पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे मुंबई महानगरपालिकेने या भागातील सर्व नागरिकांना केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई चांगली जीवनशैली जगण्याची संधी देते | IIT सर्वेक्षण | ट्विटर क्वीनही तोंडघशी
मागील काही महिन्यांपासून कंगना रानौतने व्यक्तिगत विषयावरून मुंबई शहराची अत्यंत वाईट प्रकारे बदनामी केली. अगदी कळस म्हणजे तिने मुंबईला थेट PoK म्हटल्याचं देखील देशाने पाहिलं आणि मुंबईत कसे अत्याचार होतात याचा कपोकल्पित पाढे वाचताना मुंबई पोलिसांना देखील तिने माफिया म्हटल्याने राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. वास्तविक मुंबई शहर आजची देशातील कोणत्याही शहरांच्या तुलनेत सर्वाधिक सुरक्षित आहे हे सर्वश्रुत आहे आणि इथल्या लोकांनादेखील चांगली जीवनशैली जगण्याची संधी मिळते याला सर्वेक्षणातून देखील दुजोरा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS