महत्वाच्या बातम्या
-
एखाद्याने कितीही मूर्खपणा केला तरी | सरकार व प्रशासनाने कायद्याची चौकट तोडू नये - हायकोर्ट
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर (Bollywood Actress Kangana Ranaut Mumbai Office) मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला आहे. कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. आज कोर्टाने या याचिकेवर आपला निकाल दिला आहे. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईला PoK संबोधने, व्यक्ती व सरकारविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे | हायकोर्टाची कंगनाला समज
बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर (Bollywood Actress Kangana Ranaut Mumbai Office) मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला आहे. कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली होती. आज कोर्टाने या याचिकेवर आपला निकाल दिला आहे. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमली पदार्थ प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष यांना दिलासा | जामीन मंजूर
ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे (NDPS Court grants Bail). किल्ला कोर्टाने 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. अटक झाल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या जामीन अर्जावर आज (23 नोव्हेंबर) सकाळपासून सुनावणी सुरू होती.
4 वर्षांपूर्वी -
वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर ड्रग्ज विक्रेत्यांकडून हल्ला
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करणाऱ्या NCB च्या पथकावर हल्ला झाला आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या NCB च्या पथकावर हल्ला झाला आहे. डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह त्यांच्या टीममधील पाच जणांवर यावेळी या पेडलर्सकडून हल्ला करण्यात आला. यात NCB चे दोन अधिकारी जखमी झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शिवाजी पार्कचं नामांतर | आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क नावाची पाटी लागणार
मुंबई दादरमधील प्रसिद्ध शिवाजी मैदानाचं नाव अखेर अधिकृतपणे बदलण्यात आलं आहे. यापुढे शिवाजी पार्क मैदान ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ या नावाने ओळखले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. या मैदानाच्या नामांतराचा प्रस्ताव मार्च महिन्यात पालिका सभागृहात मांडण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
त्याने मीडियाची खिल्ली उडवली, माध्यमांचा गैरवापर केला | रजत शर्मा कोणावर संतापले?
रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई न्यायालयानं दिलेल्या अंतरिम जामीनाच्या अर्जावर दिलेल्या आदेशाला गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) आव्हान दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामींच्या चौकशीला कोर्टाचा हिरवा कंदील | रोज कारागृहात ३ तास चौकशी
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला आहे आणि त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं असून, तिथेच दररोज तब्बल ३ तास चौकशी करण्याची परवानगी कोर्टाने पोलिसांना दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हे प्रकरण अतिशय गंभीर | अशा प्रकारे जामीन देता येणार नाही - उच्च न्यायालय
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टातही गोस्वामी यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई हायकोर्टाने त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले.
4 वर्षांपूर्वी -
फटाके फोडण्यास बीएमसीची बंदी | पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही आहे सूट...
मुंबईत शहरात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मुंबई महापालिकेने ((Mumbai Municipal Corporation Ban Crackers during Diwali Festival) बंदी घातली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेनं एक अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर पत्रकानुसार, शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फोडण्यास सक्त मनाई घालण्यात आली आहे. कुठल्याही हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, मैदान यांच्या आवारात फटाके फोडण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, खासगी म्हणजेच फक्त घराच्या, इमारतीच्या आवारात १४ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सौम्य स्वरूपाचे फटाके (Permission is granted only during Laxmi Pujan Day) फोडता येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपची पोलखोल | कांजूरमार्गच्या जागेसाठी फडणवीस सरकारनेच केंद्राकडे प्रस्ताव दिलेला
आरेतील जंगल वाचविण्यासाठी आणि मुंबई शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत प्रकल्प मुंबईतील कांजूरमार्गच्या जागेवर हलवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर भाजप आणि ठाकरे सरकारमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याच पाहायला मिळालं होतं. धक्कादायक म्हणजे काही दिवसातच कांजूरच्या जागेवर थेट केंद्राने मालकीचा दावा ठोकला आणि वाद चिघळणार याचे संकेत मिळू लागले. विशेष म्हणजे केंद्र सरकार यामध्ये अडथळे आणत असल्याचा संदेश सामान्य लोकांपर्यंत आधीच गेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णबसाठी आंदोलनं | भाजपा रिपब्लिकवर स्वतःची फुकट जाहिरात करुन घेतंय - कुणाल कामरा
स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनांची खिल्ली उडवली आहे. त्याला कारण ठरलं आहे ते अर्णब गोस्वामींची झालेली अटक आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून सुरु झालेली आंदोलनं. समाज माध्यमांवर पोस्ट करत त्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मेट्रो ३ कांजूरमार्गच्या जमिनीवर केंद्राचा दावा | मोदी सरकार व गुजरात केडरचे अधिकारी सरसावले
ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी अधिकृत घोषणा करून कागदोपत्री आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर राज्य सरकारचा सर्वबाजूंनी कौतुक करण्यात आलं होतं. या निर्णयानंतर राज्यातील भाजप आणि ठाकरे सरकारमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र यामध्ये केंद्रातील मोदी सरकारने आडकाठी घातल्याने खळबळ माजली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Electricity OFF | डिझेलच्या जनरेटवर रुग्णालयात वीज पुरवठा करण्याची कसरत
सोमवारी सकाळच्या सुमारास आठवड्याची सुरुवात झालेली असतानाच आणि ऐन कार्यालयीन कामांना वेग आलेला असतानाच संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. अचानक मुंबई शहरात वीज गेल्यामुळं अनेक कामांमध्ये अडथळे आल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा रुळावर येणाऱ्या रेल्वे सेवेवरही याचा थेट परिणाम झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आरेची जागा राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस राज्य सरकारची मंजुरी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार आरे दुग्ध वसाहत (दुग्धव्यवसाय विकास विभाग) च्या ताब्यातील 288.43 हेक्टर व वन विभागाच्या ताब्यातील 40.46 हेक्टर जमीन अशी एकूण 328.90 हेक्टर जमीन ही भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 अन्वये राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस आज मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ नाट्य समीक्षक | विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे निधन
ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत आणि प्रभावी वक्त्या प्रा. पुष्पा भावे यांचं आज (शनिवारी) मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं, त्या ८१ वर्षांच्या होत्या. शिवाजीपार्क स्माशानभूमीत त्यांच्यावर अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गिरणी कामगारांच्या नेत्या म्हणून त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्या प्रभावी वक्त्या, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले
मुंबईत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं आपल्याला एनडीटीव्ही व एबीपीच्या पत्रकारांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भंडारी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे हे बघा असं सांगत एनडिटिव्ही व एबीपीच्या गुंड पत्रकारांनी आपल्याला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये प्रदीप भंडारी यांना इतर पत्रकारांकडून धक्काबुक्की होताना दिसत आहे. प्रदीप भंडारी यांनी ट्विट करत एनडीटीव्ही आणि एबीपीच्या पत्रकारांचा गुंड असा उल्लेख केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दुर्घटना | मुंबई नागपाड्यातील मिश्रा इमारतीचा काही भाग एकच्या सुमारास कोसळला
मुंबईतील मालाडमधील व महाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात आणखी एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना आमदाराने उभारलेला नित्कृष्ट दर्जाचा लाकडी कृत्रिम तलाव कोसळला
भांडुपमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मुंबईत पहिल्यांदाज लाकड़ी साहित्य वापरून कृत्रिम तलाव उभारण्यात येत असल्याचे सांगून आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते भूमिपूजनाचा नारळ फुटला. मात्र, उभारणीच्या दुसऱ्याच दिवशी हा कृत्रिम तलाव कोसळल्याने लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. विशेष म्हणजे यात सेनेच्या स्थानिक पदाधिकारीकडून या कामाचे कंत्राट घेण्यात आले होते. यासाठी चार लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्याचे समजते. या कामामुळे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र कामतने आत्महत्या करून जीवन संपवले
सिद्ध कलाकार आणि फोटोग्राफर राम इंद्रनील कामतने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले आहे. तो 41 वर्षांचा होता. मुंबईतील माटुंगा याठिकाणी बाथटबमध्ये रामचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मीडिया अहवालांच्या मते, राम गेल्या काही दिवसांपासून तणावामध्ये होता आणि लॉकडाऊन काळात ही परिस्थिती आणखी बिघडत गेली.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | न्हावा-शेवा बंदरातून तब्बल १ हजार कोटींचे ड्रग्ज ताब्यात
नवी मुंबईच्या पोर्टमधून १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. अफगाणिस्तानमधून इराणच्या माध्यमातून इथे ड्रग्ज आणण्यात आले होते. डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलीजन्स ( DRI) आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. तस्करांनी हे ड्रग्ज प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. हे आयुर्वेदीक औषध असल्याचे ते सांगत होते. ड्रग्ज इम्पोर्टचे कागदपत्र बनवणाऱ्या दोन कस्टम हाऊस एजंट्सना देखील अटक करण्यात आलीय. याशिवाय चार इतर इंपोर्टर आणि फायनान्सर्सना अटक करण्यात आलीयं. दोघांना आज मुंबईत आणलं जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार