महत्वाच्या बातम्या
-
टकटक गँग | अभिनेते भारत गणेशपुरे यांनी अनुभवला एक वाईट प्रसंग
तुमची गाडी सिग्नलवर उभी असेल, तर टकटक करून लक्ष वेधून घ्यायचे आणि तुमच्या किंमती वस्तू लंपास करायच्या, अशी शक्कल लढवण्यात टकटक गँग माहीर असते. मात्र आता तेवढ्यापुरते आपले हस्तकौशल्य न दाखवता थेट आयफोनची आंतरराष्ट्रीय सुरक्षा भेदून फोनमधला पूर्ण डाटाच डिलिट करण्यापर्यंत ही टोळी हायटेकही झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीत असोसिएट व्हाइस प्रेसिडेन्ट पदावर असलेल्या ३२ वर्षांच्या तरुणास ठाण्यातील मानपाडा पुलावर अशा फसवणुकीचा फटका बसला होता.
5 वर्षांपूर्वी -
नालासोपारा स्थानकात ट्रॅकवर उतरून प्रवाशांचा हंगामा, लोकलमधून प्रवासाची मागणी
आम्हाला लोकलमधून प्रवास करू द्या’, अशी मागणी करत आज नालासोपारा रेल्वे स्थानकात सर्वसामान्य प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रवाशांचा संताप अनावर झाल्याचे दिसून आले. प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून मोठा हंगामा केला होता. दरम्यान, या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती
मुंबईतील मालाडमध्ये अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एका चाळीतील दुमजली घर कोसळलं. ही दुर्घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली दबून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 6 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी; मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली
कोरोनाचा संकट डोक्यावर असताना आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. दक्षिण मुंबईतस्थित ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कराची येथून हा धमकीचा फोन आल्याचं वृत्त समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा मृत्यू
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या युसूफ मेमनचे नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये निधन झाले आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकलेले नसून शवविच्छेदनासाठी मृतदेह धुळ्यात पाठवण्यात आला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. युसूफ मेमन हा अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमन याचा भाऊ होता.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई २६/११ हल्ला : मास्टरमाईंड तहव्वूर हुसैनला अमेरिकेत अटक
मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ हल्ल्याचा कट रचलेल्या मास्टर माईंड दहशतवादी तहव्वूर हुसैन राणाला अमेरिकेत अटक करण्यात आलं आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमधून राणाला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राणाचं भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. राणा हा पाकिस्तान – कॅनडाचा नागरिक असून अमेरिकेने या हल्ल्यामध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून शिक्षाही केली होती.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे वृध्दपकाळाने निधन
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे त्यांच्या दादर येथील निवासस्थानी आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. १६ मे रोजी दिनू रणदिवे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. आणि एका महिन्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पावसामुळे मुंबईत सखल भागांत पाणी साचायला सुरुवात
काल रत्नागिरी, रायगड आणि पुण्याला ‘निसर्ग’ चक्रीवादळाने झोडपले. या वादळाचा तडाखा मुंबईलाही बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र रायगडकडून वादळाने दिशा बदलली, त्यामुळे मुंबईवरील धोका टळला. परंतु तरीही काल मुंबईत पावसाने वादळी वाऱ्यासह जोर धरला होता. त्यांनतर मुंबईकरांची आजच्या दिवसाची सुरुवातही पावसानेच झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वानखेडे स्टेडिअम ताब्यात न घेण्यामागील कारण आदित्य ठाकरेंनी केलं स्पष्ट
क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेतलं जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. मुंबईतील कोणतंच मैदान ताब्यात घेतलं जाणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महापौर किशोरी पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडिअमला भेट देत मैदानाची पाहणी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो कोणी पदार्थ खाल्ले तिकडे? अन्न पुरवणाऱ्या 'त्या' महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत आहे. असं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
क्वॉरंटाइन कँम्पमधून रुग्णांचे पलायन सुरु; अखेर मनसेची 'ती' मागणी योग्य ठरली
करोनावर उपचार घेत असलेले १५ संशयित रुग्ण क्वॉरंटाइनमधून पळाले होते. मात्र, या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आलं आहे. हे सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते. हे सर्वजण मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा स्टँम्प मारलेला होता. त्यांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून न हालण्याची सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र हे १५जण क्वॉरंटाइन कँम्पमधून पळाले. अंधेरीत त्यांनी लोकल पकडली आणि खारमध्ये उतरले. त्यांना खारमध्येच ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या १५ जणांना पकडण्यासाठी पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली होती.
5 वर्षांपूर्वी -
मोलकरणीला कोरोना झाल्याचे सिद्ध..श्रीमंतांमार्फत कोरोना झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचला
करोनावर उपचार घेत असलेले १५ संशयित रुग्ण क्वॉरंटाइनमधून पळाले होते. मात्र, या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आलं आहे. हे सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते. हे सर्वजण मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा स्टँम्प मारलेला होता. त्यांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून न हालण्याची सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र हे १५जण क्वॉरंटाइन कँम्पमधून पळाले.
5 वर्षांपूर्वी -
एक्सप्रेस महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी, पोलिसांनी अनेकांना परत पाठवलं
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लोकांनी गर्दी करू नये म्हणून जमावबंदी आदेशही जारी करण्यात आलेले आहेत. सरकारकडून सर्व प्रयत्न सुरू असतानाच मुंबई-पुण्यातील नागरिक मात्र बेपर्वाईने वागताना दिसत आहेत. मुंबई-पुण्यातील लोक आज नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. त्यामुळे मुंबईत मुलुंड आणि सायन येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी! तुम्हीच सणासारखे वातावरण निर्माण केले; संजय राऊत संतापले
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या आवाहनानंतरही काही लोकांकडून त्याची गंभीरपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसले नाही. अनेकजण अजूनही सुरक्षेचे उपाय करताना दिसत नाही. सरकारच्या आवाहनानंतरही सोमवारी मोठ्याप्रमाणात लोक बाहेर पडले आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बेजबाबदारपणावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी टि्वट करुन आपली नाराजी जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनामुळे ६८ वर्षीय परदेशी नागरिकाचा मृत्यू
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
खासगी बस, एसटी पूर्णपणे बंद; शहरातील बस सेवा फक्त अत्यावश्यक सेवांसाठी: मुख्यमंत्री
करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला मुंबई,ठाणे,पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यात रस्त्यांवर, लोकल आणि बसमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. लोकांनी घरातच राहणं पसंत केल्याने राज्यात कडकडीत संचार बंदी पाळली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती : महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने...
महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता ७४वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा ३२४ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील काही तासांत कोरोनाचे १० नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील ६ रुग्ण मुंबईतील असून इतर ४ रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाचा दुसरा बळी, मुंबईत ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असं असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू झाला आहे. मुंबईमध्येहे. एका ६३ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे.
5 वर्षांपूर्वी -
#CoronaVirus : दहावीचा सोमवारचा पेपर पुढे ढकलला
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. सोमवारी होणारा पेपर आता ३१ मार्चनंतर होणार आहे. ३१ मार्चनंतर परिस्थिती पाहून पेपरची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. सोमवारी सामाजिक शास्त्रे पेपर-२ भुगोल, या विषयाचा पेपर होता.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना काळजी! मुंबईकरांचं दुर्लक्ष, समूहात मॉर्निंग वॉक आणि सूट्टीतलं क्रिकेट सुरूच
देशात, तसेच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL